Viral Video : सध्या सोशल मीडियावर वन्यप्राण्यांचे व्हिडीओ अधिक व्हायरल होताना दिसतात. कधी जंगलात शिकार करतानाचे, कधी प्राण्यांच्या झुंजीचे तर कधी जंगल्या प्राण्यांनी माणसांवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. असे व्हिडीओ प्रचंड चर्चेतही येतात. आता असाच एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल, एवढं नक्की.


डोंगराळ भागात आणि घनदाट जंगलात बिबट्या घात लावून शिकार अनेकदा करताना दिसून येतो. कधी रात्रीच्या अंधारात तर कधी उजेडा बिबट्या शिकार करतो. सध्या मानवी वस्तीत बिबट्याचा संपर्क अधिक येताना दिसत आहे. बिबट्यांचं माणसांवरही हल्ले वाढू लागले आहेत. बिबट्या भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीजवळ पोहोचू लागले आहेत. यामुळे बचावाकरताना बिबट्या माणसांवर हल्ला करताना दिसतो.






 


असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बिबट्या मानवी वस्तीत शिरल्याचं दिसून येत आहे. हा बिबट्या निवासी भागात घुसल्यानंतर त्याला थांबवण्यासाठी उभ्या असलेल्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करतो. या हल्ल्यात माणूस घाबरून मागे हटण्याऐवजी बिबट्याचा बेधडकपणे सामना करतो. या व्यक्तीच्या एक हाती झुंजीचा व्हिडीओ खरंच कौतुकास्पद आहे.


बिबट्याने व्यक्तीवर हल्ला केल्यानंतर तेथे उपस्थित लोकांनी त्यांच्याजवळ बचावासाठी काठी फेकली. त्यानंतर बिबट्या त्या व्यक्तीला सोडून पुढे जातो. बिबट्याचा सामना करणाऱ्या व्यक्तीने आपल्या धाडसाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. सोशल मीडिया यूजर्स त्या व्यक्तीचं भरभरून कौतुक करताना दिसतात. आतापर्यंत हा व्हिडीओला 5 लाखांहून अधिक लोकांनी बघितला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या