Tamil Nadu Woman Disguised as Man : आईला जगातील सर्वात मोठा योद्धा म्हटलं जातं. याचा प्रयत्य पुन्हा एकदा तामिळनाडूतील घटनेवरून आला आहे. तमिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यात राहणाऱ्या एका आईच्या संघर्षाची कहाणी समोर आली आहे. भारत हा पुरुषप्रधान देश आहे जिथे आईच्या मायेसह वडिलांचा आधार गरजेचा असतो. पण पेचियाम्मल या महिलेने एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे.
आपल्या मुलीचं संगोपन आणि मुलीचं संरक्षण करण्यासाठी पेचियाम्मल यांनी तब्बल 30 हून अधिक वर्षे पुरुषाचा वेश धारण करत पुरुषाप्रमाणेचं आयुष्य घालवलं. स्त्रियांसाठी शृंगार करणंही महत्त्वाची गोष्ट असते. मात्र तामिळनाडूतील या आईने मुलीच्या भवितव्यासाठी सजणं, सवरणं सोडून आयुष्यातील 30 वर्षे लुंगी आणि शर्ट परिधान करत घालवली. त्यांनी सुमारे 30 वर्षे एक पुरुष बनून आयुष्य घालवलं आणि मुलीचं संगोपन केलं.
पेचियाम्मल यांची कहाणी खूप संघर्षाची आहे. पेचियाम्मल 20 वर्षांची असताना त्यांचं लग्न झालं. दुर्दैवानं लग्नाच्या अवघ्या 15 दिवसांनंतरच त्यांच्या पतीचं निधन झाल्यानं त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मुलीच्या जन्मानंतर तिचे पालन करण्यासाठी त्यांना काम करण्यास भाग पडावे लागले. मात्र लोकांनी त्यांनी नीट वागणूक दिली नाही. त्यामुळे त्यांनी आपली ओळख बदलून पुरुष बनून राहण्याचा विचार केला. मुलीच्या भविष्यासाठी त्यांनी दुसरं लग्न न करण्याचा विचार केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेचियाम्मल यांच्या कागदपत्रांमध्ये त्यांचं नाव मुथू कुमार आहे.
पेचियाम्मल यांनी आयुष्यातील अनेक वर्षे चेन्नई आणि थुथुकुडी येथील हॉटेल्स आणि ढाब्यांवर काम केलं. त्यानंतर त्यांनी चहा आणि पराठ्याचं दुकान सुरू केलं. त्यांना मुथू मास्टर म्हणून ओळखलं जातं. पुरुष होण्याचा त्यांचा निर्णय संघर्षाचा होता, परंतु आपल्या मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी त्यांनी खडतर संघर्ष केला. यावेळी त्यांना बसमध्ये पुरुषांच्या आसनांवर बसावे लागले आणि पुरुष स्वच्छतागृहाचाही वापर करावा लागला. मात्र त्यांनी मुलीसाठी हा सर्व त्रास सहन केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या
Viral Video : मांजरीची छेड काढणं कुत्र्याला पडलं महाग, पुढे काय झालं तुम्हीच पाहा
NASA : मंगळ ग्रहावर दिसला एलियनच्या घराचा दरवाजा? नासाच्या नव्या फोटोंचं गूढ काय?
- Trending News : स्वत:ला आग लावत वधूवराची 'डेयरडेव्हिल एंट्री', थरारक स्टंटचा व्हिडीओ एकदा पाहाच