Jharkhand Update : झारखंडच्या देवघर येथे झालेल्या रोपवे अपघातात आतापर्यंत 32 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अजूनही 15 जण रोपवेमध्ये अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. ट्रॉलीमध्ये अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
सोमवारी सायंकाळी 6 वाजता बचावकार्य थांबवण्यात आलं
बचावकार्या दरम्यान सोमवारी एक घटना घडली. एका व्यक्ती ट्रॉलीतून बाहेर काढून हेलिकॉप्टरमध्ये नेले जात होते. यावेळी त्या व्यक्तीचा हात सुटून ती व्यक्ती खोल दरीत खाली कोसळली. रात्री अंधारामुळे बचावकार्यात अडथळा येत असल्याने सोमवारी सायंकाळी 6 वाजता बचावकार्य थांबवण्यात आलं. त्यानंतर आता पुन्हा सकाळी 6 वाजल्यापासून बटावकार्यला सुरुवात करण्यात आळील आहे. सध्या ट्रॉलीमध्ये 15 प्रवासी अडकले आहेत. तसेच सुखरुप बाहेर काढण्यात आलेल्या लोकांवर देवघरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं ट्वीट
या घटनेवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे की, 'त्रिकुट पर्वतावर झालेल्या दुर्घटनेबाबत ऐकून दु:ख झालं. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल.'
आतापर्यंत 32 जणांना वाचवण्यात यश
झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील मोहनपूर ब्लॉक अंतर्गत त्रिकुट पर्वतावरील रोपवे अपघात झाला आहे. येथील त्रिकूट डोंगरावरील रोपवेमध्ये बिघाड झाल्यानं अनेक पर्यटक ट्रॉलीमध्ये अडकले. ही घटना रविवारी दुपारी 3 वाजता घडली. एकूण 48 लोक अडकले होते. त्यापैकी 32 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
पाहा Special Report : झारखंडमधल्या रोप वे दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू |
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ट्रेन मध्येच थांबली अन् प्रवासी खाली उतरले, दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या भरधाव ट्रेनने पाच जणांना चिरडले
- गाझियाबादच्या कानवानी येथील झोपडपट्टीला भीषण आग, 40 गायींचा मृत्यू
- खूपच कमी किंमतीत BSNL देत आहे फ्री कॉल आणि डेटा; 49 रुपयांपासून किंमत सुरू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha