Optical Illusion : मेंढ्यामध्ये लपले आहेत तीन ढग, स्मार्ट असाल तर 10 सेकंदात शोधा; 95 टक्के लोक फेल
Brain Challenge : तुमची बुद्धिमत्ता तपासण्यासाठी इंटरनेटवर काही ब्रेन चँलेज व्हायरल होत असतात. तुम्हीही हे चॅलेंज स्वीकारून पाहा.
Optical Illusion Find Cloud : सोशल मीडियामुळे (Social Media) मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. सोशल मीडियावर (Social Media) विविध पद्धतीने तुमचं मनोरंजन होतं. कधी व्हायरल फोटो आणि व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलतं तर कधी हैराण करणारे स्टंट पाहून चकित व्हायला होतं. व्हायरल फोटो किंवा व्हिडीओ पाहताना वेळ कधी निघून जातो कळत सुद्धा नाही. काही लोक इंटरनेटवर सर्फिंग करताना, ऑनलाईन बातम्या आणि पुस्तके वाचताना दिसतात. तर काही लोक त्यांचा मोकळा वेळ मेंदूची बुद्धिमत्ता वाढवणाऱ्या खेळांमध्ये घालवतात.
तुमची बुद्धिमत्ता तपासण्यासाठी इंटरनेटवर काही ब्रेन चँलेज व्हायरल होत असतात. तुम्हीही साध्या आणि सोप्या कोड्यांची किंवा प्रश्नांची उत्तर देऊन तुमची बुद्धिमत्ता तपासू शकता.
'हे' चॅलेंज स्वीकारा
आम्ही तुमच्यासाठी ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) चॅलेंज घेऊन आलो आहोत. ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) प्रकारातील फोटोंचे चॅलेन्ज मोठ्या प्रमाणात चर्चेत असल्याचं दिसून येते. चित्रातील प्राण्याची संख्या किती, चित्रातील व्यक्तींची संख्या किती किंवा प्राणी, पक्षी शोधा अशा प्रकारचे अनेक फोटो व्हायरल होताना पाहायला मिळतात. ऑप्टिकल इल्युजन फोटो डोळ्यांना चकवा देणारे असतात. यामध्ये लपलेल्या गोष्टी शोधणे थोडं कठीण आहे. आजही आम्ही तुमच्यासाठी जो ऑप्टिकल इल्युजन फोटो घेऊन आलो आहोत.
मेंढ्यांच्या फोटोत लपलंय काय?
आज आम्ही तुमच्यासाठी असेच एक कोडं आणलं आहे. यामुळे तुमच्या बुद्धीचा व्यायाम करण्यास मदत होईल. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अनेक मेंढ्या दिसत आहेत, पण या फोटोमध्ये तीन ढगही लपलेले आहेत. जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तरच तुम्हाला या फोटोमधील तीन ढग दिसतील. हे कोडं सोडवण्यासाठी तुम्हाला फक्त 10 सेकंदांचा वेळ देण्यात आला आहे. तुमचा वेळ आता सुरू झाला आहे. खाली दिलेल्या फोटोमध्ये लपलेले ढग शोधा.
'हे' आहे उत्तर
मेंढ्यांमध्ये लपलेले ढग तुम्हाला खाली दिलेल्या फोटोमध्ये वर्तुळ करुन दाखवण्यात आले आहेत. दिलेल्या वेळेत तुम्हाला हे तीन ढग दिसले का? जर होय, तर तुमची नजर खरोखर तीक्ष्ण आहे आणि ज्यांना अद्याप ढग सापडले नाहीत ते येथे दिलेल्या फोटोत उत्तर पाहू शकतात. आम्ही तुमच्यासाठी अशी अनेक कोडी घेऊन येत राहू ज्यामुळे तुमच्या बुद्धीचा व्यायाम होत राहील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Pollution Effect : माणसांमुळे माशा समलैंगिक होत आहेत, संशोधनात धक्कादायक माहिती उघड; 'हे' आहे कारण