International Beer Day : आज आंतरराष्ट्रीय बिअर दिन आहे. प्रत्येक वर्षी ऑगस्टचा पहिला शुक्रवार हा आंतरराष्ट्रीय बिअर दिन (International Beer Day) म्हणून सेलिब्रेट केला जातो. बिअर पिण्याचे कैक फायदे आपल्याला मद्यप्रेमी सांगत असतात मात्र ते खरंच खरे असतात का? याबद्दल आपल्याला माहिती नसते. मात्र बिअर पिण्याचे खरोखर काही फायदे आहेत. मात्र फायद्यासोबत बिअर पिण्याचे तोटे देखील आहेत. आज आंतरराष्ट्रीय बिअर दिनानिमित्त आपण बिअरचे फायदे आणि तोटे जाणून घेऊयात...


बीअर पिताय... जरा सावधान!


बिअर पिण्याचे फायदे
बिअर पिणाऱ्या लोकांना प्रकार दोनच्या मधुमेहाचा धोका 25 टक्क्यांपर्यंत कमी असतो. बिअरच्या सेवनाने हाडांना बळकटी मिळते पण प्रमाणाबाहेर बीअर सेवन केल्यास ती आरोग्यास अपायकारक आहे. हेट्रोसायकलिक अमीन्समुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. अल्झायमर आणि डिमेंशिआ सारख्या आजारात बिअर फायदेशीर आहे.बिअरमध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर असल्याने किडनीसाठी उपयुक्त असते.बिअरव्यतिरिक्त अन्य ड्रींक्स जास्त प्रमाणात सेवन केल्याने मुतखड्याचा त्रास होऊ शकतो. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी चांगली ठेवण्यासाठी बिअर उपयुक्त आहे. पिंट बिअरच्या सेवनाने हृदयरोगाचा धोका 31 टक्क्यांपर्यंत कमी होतो. बिअरमध्ये व्हिटॅमिन बी6 आणि बी 12 मोठ्या प्रमाणावर असतात. यात असलेल्या सिलिकॉनमुळे हाडं मजबूत होतात.बिअरमध्ये आरोग्यास उपयुक्त असे बरेच पोषक तत्व असतात. यात पँटोथॅनिक अॅसिड, नियासिन, फोलेट, रिबोफ्लावीनसारखे बरेच घटक शरीरास फायदेशीर असतात. चहा, कॉफीनंतर लोकांची सर्वाधिक पसंती असणारे पेय आहे. पण याचा वापर मर्यादित प्रमाणात केल्यास आरोग्यास अपाय होत नाही. बिअर एक मद्य असलं तरीही प्रमाणात घेतल्यास बिअर फायदेशीर असते. 


बिअर पिण्याचे तोटे
बिअर अल्कोहोलीक आहे, पण तरीही जगभरातील अनेकजण त्याचे सेवन करतात. बिअरचे कमी प्रमाणात सेवन आरोग्यासाठी लाभदायी असल्याचे अनेक रिसर्चमधून सांगितले जाते. मात्र, बिअरच्या सेवनाने मधूमेहाचा धोकाही संभवतो.अल्कोहोलमुळे शरिरातील ग्लूकोजचं प्रमाणही कमी होतं. ग्लूकोज कमी झाल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. यामुळे बीअरचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना मधूमेहाचे विकार होण्याची शक्यता बळावते. वास्तविक, बिअरमध्ये 5 टक्क्याहूनही कमी म्हणजे 150 कॅलेरी अल्कोहोल असतं. म्हणजे एका 350 ml बिअरच्या बॅटलमध्ये 13 ग्रॅम कार्बोहायड्रेड असतात. त्यामुळे बिअरच्या अधिक प्रमाणात सेवनाने इंसुलिनचं शरिरातील प्रमाण वाढून सेंसिटिव्हीटी कमी होते. त्यामुळे बिअरने शरिरातील साखरेचं प्रमाण लगेच वाढवत नसलं, तरी त्याच्या अति आणि दीर्घकाळ सेवनाने मधूमेहासारखे गंभीर आजार संभवतात. अल्कोहोलच्या सेवनाने क्रोनिक पॅन्क्रियाटाइटिस या रोगाचाही धोका संभवतो. गंभीर आजार असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बिअरचे सेवन करु नये.