NASA Trending Post : नासाने (NASA) इनसाइट मार्स लँडरचे (InSight Mars Lander) फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. नासाने इनसाइट लँडरचा सेल्फी शेअर केला आहे. हा शेवटचा सेल्फी असल्याचं नासानं म्हटलं आहे. 2018 मध्ये मंगळ ग्रहावर नासाच्या इनसाइट मार्स लँडर गेल्यापासून मंगळ ग्रहाबद्दल अनेक गूढ आणि महत्त्वाची माहिती पाठवली आहे. नासा अनेकदा या लँडरकडून मिळालेली माहिती सोशल मीडिया अकाउंटवरून वेळोवेळी शेअर करत असते.


नासाने नुकतीच एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट इनसाइट मार्स लँडरची अंतिम सेल्फी आहे. लँडरचा सेल्फी शेअर करण्यासोबतच नासाने कॅप्शनमध्ये Final Selfie असा उल्लेख केला आहे. पोस्ट शेअर करत नासाने म्हटलं आहे की, 'हवेतील धूळ. इनसाइट मार्स लँडर मंगळ ग्रहाच्या संपर्कात आल्यापासून मंगळावरील 1211 दिवस कसे होते पाहण्यासाठी स्वाइप करा.'






 


यासोबत नासाने दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एक फोटो लँडरने मंगळावरील प्रवास सुरू केला तेव्हाचा आहे आणि दुसरा फोटो सध्याचा वर्तमान स्थिती दाखवणारा आहे. पोस्टमध्ये पुढे असे लिहिले आहे की, 'आमच्या इनसाइट मार्स लँडरने 24 एप्रिल 2022 रोजी त्याचा शेवटचा सेल्फी काढला, यामध्ये धूळ दिसत आहे.' नासाने पुढे लँडरच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.




इनसाइट मार्स लँडरचं काम काय?
इनसाइट मार्स लँडर 26 नोव्हेंबर 2018 रोजी मंगळावर पोहोचले. लँडर सौर पॅनेल असलेलं इनसाइट मार्स लँडर मंगळ ग्रह आणि त्याच्या आतील भागाचं परिक्षण करण्यासाठी उपकरणांनी सुसज्ज असं लँडर आहे. लँडरने मंगळ ग्रहावरील हवामान, चुंबकीय क्षेत्र, तसेच भूकंप आणि इतर माहिती पृथ्वीवर पाठवली. इनसाइट लॅंडर त्याचा शेवटचा सिग्नल पृथ्वी पाठवल्यानंतर डिसेंबरपर्यंत काम सुरू ठेवण्याची अपेक्षा आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या