Video Viral : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे महानगरातील अनेक भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. पाणी साचल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. सततच्या पावसाने मुंबईच्या वाहतुकीला ब्रेक लावला असून वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली आहे, अशा परिस्थितीत सोशल मीडीयावर सध्या एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती घोड्यावर स्वार होऊन डिलीव्हरी करताना दिसत आहे.


स्विगी एजंटने घोड्यावर बसून केली डिलीव्हरी


मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणी साचल्याने वाहतुक संथ झालीय, अशातच या डिलीव्हरी बॉयने एक वेगळा मार्ग शोधला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, एका पांढऱ्या घोड्यावर बसून डिलिव्हरी बॉय खांद्यावर बॅग घेऊन फूड डिलिव्हरीसाठी जात असल्याचे दिसून येते. हा व्हिडीओ काही सेकंदांचाच आहे. त्याचवेळी, सोशल मीडीयावर लोक भर पावसातही डिलिव्हरी बॉयच्या कार्याचे कौतुक करत आहेत.


 



 


स्विगी एजंटची स्टाइल लोकांनी आवडली
हा डिलिव्हरी बॉय ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीचा एजंट असल्याचं सांगण्यात येत आहे. नेटिझन्स स्विगी डिलिव्हरी एजंटच्या या स्टाइलचे कौतुक करत आहेत. त्याचबरोबर प्रवासासाठी घोडा हाही पर्याय असू शकतो, असेही नेटकरी सांगत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :