Trending News : तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल, जी तुम्ही संकटात असतानाही तुमची साथ सोडत नाही, खांद्याला खांदा लावून चालत असेल आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला कधीही एकटे वाटू देत नसेल, तर तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. कारण एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये हे पक्षी देखील हाच संदेश देतात की, संकटात प्रिय व्यक्तींची साथ कधीही सोडू नये.
छोटे दोन पक्षी तुम्हाला एक मोठा धडा देऊन जातात
ऑनलाइन शेअर केलेल्या या व्हिडीओ क्लिपमध्ये दाखवलेले छोटे दोन पक्षी तुम्हाला एक मोठा धडा देऊन जातात. व्हिडिओमध्ये दोन पक्षी एका वायरवर बसलेले दिसतात. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे जोरदार वादळासह पाऊस पडतोय. वारा इतक्या वेगाने वाहत आहे की, दोघेही पडू लागतात पण एकमेकांच्या आधारामुळे ते एकाच दोरीवर टिकून राहतात. हा व्हिडिओ एक सुंदर संदेश देतो, जो प्रत्येकाने समजून घेणे खूप महत्वाचे आहे.
IPS अधिकाऱ्यांची पोस्ट
तुफान वादळातही दोन पक्षी एकमेकांचे रक्षण करतानाचा हा व्हिडिओ पाहणे युझर्ससाठी खूपच मनोरंजक होते. ऑनलाइन व्हायरल क्लिप IPS अधिकारी दिपांशू काबरा यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे. 5 जुलै रोजी पोस्ट केलेल्या क्लिपला इतक्या लवकर 1 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्युज (1.1 दशलक्ष दृश्ये) मिळाली आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'आयुष्यात कितीही वादळ आले तरी जे आपले आहेत, ते खंबीरपणे एकत्र उभे आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :