Bihar : बिहारमधील (Bihar) एक प्राध्यापक हे सध्या त्यांच्या प्रामाणिकपणामुळे चर्चेत आहे. अनेक जण सध्या या प्रध्यापकांचे कौतुक करत आहे. फी जास्त घेऊन देखील विद्यार्थ्यांना न शिकण्याचा आरोप अनेकवेळा शिक्षकांवर केला जातो. अशातच आता बिहारच्या एका प्राध्यापकांनी दोन वर्ष नऊ महिने विद्यार्थ्यांना शिकवलं नसल्यानं त्यांचा 23 लाख 82 हजार पगार परत दिला आहे. वर्गात एकही विद्यार्थी उपस्थित राहात नव्हता त्यामुळे त्यांनी हा पगार विद्यापीठाला सुपुर्द केल्याचं त्या प्राध्यापकांनी सांगितलं. 


कोण आहेत पगार परत देणारे हे प्राध्यापक? 
डॉ. ललन कुमार हे  मुजफ्फरपूरच्या  नीतीश्‍वर कॉलेजमध्ये सहाय्यक प्रोफेसर आहेत. त्यांनी मंगळवारी कुलसचिव डॉ आर.के. ठाकूर यांना 23 लाख 82 हजाराचा चेक दिला. सुरुवातीला आर.के.ठाकूर यांनी प्रोफेसर ललन कुमार यांच्याकडून हा चेक घेण्यास नकार दिला. पण नंतर त्यांनी हा चेक घेतला. डॉ लालन कुमार यांनी सांगितले की, नितीश्वर महाविद्यालयातील माझ्या अध्यापनाच्या कामाबद्दल मला कृतज्ञता वाटत नाही. त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या ज्ञानाप्रमाणे मी पगाराची रक्कम विद्यापीठाला सुपुर्द करतो.


शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले
डॉ.ललन कुमार यांनी  विद्यापीठातील शिक्षण पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केला आहे. महाविद्यालयात नियुक्ती झाल्यापासून त्यांनी येथे अभ्यासाचे वातावरण पाहिले नसल्याचे त्यांनी सांगितले.  ते म्हणाल, इथे हिंदी विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1100 आहे, पण एकही विद्यार्थी या विषयाच्या तासाला उपस्थित नसतो. हजर विद्यार्थांची संख्या शून्य असते. अशा परिस्थितीत प्राध्यापक हे आपल्या शैक्षणिक जबाबदाऱ्या नीट पार पाडू शकत नव्हते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पगार घेणं हे प्राध्यपक कुमार यांना अनैतिक वाटत होतं. त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात ऑनलाइन क्लास सुरू झाला होता, मात्र विद्यार्थी ऑनलाइन क्लासलाही हजर राहिले नाहीत. याबाबतची माहितीही त्यांनी विद्यापीठ प्रशासन आणि महाविद्यालय प्रशासनाला दिली. लालन यांची 2019 मध्ये नियुक्ती करण्यात आलेल्या डॉ. ज्या महाविद्यालयात त्यांना शैक्षणिक काम करण्याची संधी मिळेल तेथे त्यांची बदली करावी, अशी विनंती त्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे.


हेही वाचा:


IAF Father-Daughter Duo : बापलेकीनं एकत्र उडवलं लढाऊ विमान, भारतीय हवाई दलाच्या इतिहासात नवं सोनेरी पान