Indian Air Force Father-Daughter Duo : भारतीय वायू सेनेच्या सुवर्ण आणि गौरवशाली इतिहासामध्ये आज आणखी एका कामगिरीची नोंद झाली आहे. भारतीय वायू सेनेच्या इतिहासामध्ये आज आणखी एक पानं जोडलं गेलं आहे. भारतीय वायूसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा बापलेकीच्या जोडीनं एकत्र फायटर जेट (Fighter Jet) उडवलं आहे. एअर कमोडोर संजय शर्मा (Sanjay Sharma) यांनी त्यांची मुलगी फ्लाईंग ऑफिसर अनन्या शर्मा (Ananya Sharma) हिच्यासोबत फायटर जेट उडवलं आहे. लढाऊ विमान उडवणारी ही पहिली बापलेकीची जोडी आहे. या दोघांनी एकाच इन-फार्मेशनमधून (In-Formation) उड्डाण केलं.

एअर कमोडोर संजय शर्मा (Sanjay Sharma) यांची मुलगी फ्लाईंग ऑफिसर अनन्या शर्मा (Ananya Sharma) प्रशिक्षणार्थी आहे.  संजय शर्मा आणि अनन्या शर्मा या दोघांनी भारतीय हवाई दलाच्या बीदर स्टेशनवर हॉक-132 (Hawk-132) एकाच इन-फार्मेशनमधून (In-Formation) लढाऊ विमानातून उड्डाण केलं. अनन्या फायटर पायलट अभ्यासक्रमात पदवी पूर्ण करण्याआधीचं प्रशिक्षण घेत आहे. भारतीय हवाई दलाच्या इतिहासामध्ये याआधी कधीही वडील आणि मुलीने एकत्र फायटर जेट उडवलं नव्हतं.

 

मुलगी अनन्या शर्मावर वडिलांना अभिमानसंजय शर्मा (Sanjay Sharma) यांनी मुलगी अनन्या शर्मावर (Ananya Sharma) आपल्याला अभिमान असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, अनन्याची त्यांच्या प्रमाणे फायटर पायलट बनण्याची इच्छा आहे. ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याने यावर आपल्याला अभिमान आहे. भारतीय हवाई दलाने माहिती दिली आहे की, 30 मे रोजी एअर कमोडोर संजय शर्मा (Sanjay Sharma) यांनी त्यांची मुलगी फ्लाईंग ऑफिसर अनन्या शर्मा (Ananya Sharma) यांनी एकाच फॉर्मेशनमध्ये उड्डाण करत नवीन इतिहास रचला.

भारतीय हवाई दलामध्ये 2016 पासून महिलांना फायटर पायलट बनण्याची संधी देण्यात आली. आता अनेक महिला सुपरसॉनिक जेटडी उडवतात.

अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा