3D Art On Road : कलाकार तर बरेच असतात मात्र, प्रसिद्ध तेच होतात ज्यांची कला खरी वाटते. ज्यांची कला पाहिल्यावर डोळ्यांवर विश्वास बसत नाही. अशा चित्रांना किंवा कलेला 3D स्केचिंग किंवा 3D आर्ट असेही म्हणतात. या कलेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 


सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. कारण, ही कला पाहून तुम्हाला खरी आणि खोटी यामध्ये फरकच करता येणार नाही. या कलाकाराने ही कलाच इतकी अप्रतिम रेखाटली आहे की त्यातला फरकच करता येत नाहीये. सोशल मीडियावर या कलाकाराच्या कलेचे खूप कौतुक करतायत.   


पाहा हा व्हिडीओ : 






व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, ती व्यक्ती रिकाम्या रस्त्यावर पेंटिंग करू लागली आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला हे फक्त एक पेंटिंग आहे. असेच आपल्याला दिसते. मात्र, पेेटिंग पूर्ण होताच सगळं चित्र बदलतं. आणि ती पेंटिंग खरी वाटू लागते.    


पेंटिंगवर टास्क : 


हा कलाकार पेंटिंग पूर्ण झाल्यानंतर त्यावर एक टास्कही करतो. ज्यामुळे नेटकऱ्यांचा गोंधळ आणखी वाढतो. हा कलाकार बनवलेल्या खांबावर चक्क उड्या मारतो. त्यामुळे काही सेकंद तर आपण ही पेंटिंग आहे हेही विसरून जातो. हे पाहता कलाकाराच्या हातात जादू असते हेच खरं म्हणावं लागेल.  


व्हायरल झाला व्हिडिओ : 


हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर ओव्हरटाईम नावाच्या अकाऊंटसह पोस्ट करण्यात आला आहे. 20 ऑगस्ट रोजी शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओला 20 हजारांहून अधिक युजर्सनी लाईक केले आहे. एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, मला खऱ्या आणि खोट्यामध्ये फरक करणे खूप कठीण जात आहे.


महत्वाच्या बातम्या :