Viral Video : क्रिश चित्रपटात हृतिक रोशननं 'दिल ना दिया' या गाण्यावर केलेला डान्स सर्वांनीच पाहिला असेल. हृतिक रोशनच्या डान्सला सर्वांनीच पसंती दर्शवली. त्याच्या या डान्सचं अनुकरण अनेकांनी केलेय. अनेक चाहते हृतिक रोशनच्या गाण्यावर व्हिडीओ, रील्स करुन सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. यामुळे अनेकांना प्रसिद्धीही मिळाली आहे. काहीजण रात्रीत फेमस झाले. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हृतिक रोशनच्या दिल ना दिया या गाण्यावर एका आजोबांनी डान्स केलाय. हा व्हिडीओ अल्पवधीतच व्हायरल झालाय. अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केलाय. 


 हृतिक रोशनच्या क्रिश चित्रपाटीतल "दिल न लिया" या गाण्यावर एका व्यक्तीनं जबरदस्त डान्स केलाय. त्याच्या डान्स स्टेप्स हुबेहूब  हृतिक रोशनसारख्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर एस सुरेश यांनी अपलोड केलाय. हा व्हिडीओ त्यांचाच आहे. यामध्ये ते जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.


पाहा व्हायरल व्हिडीओ.... 






व्हिडीओला 50 हजारांपेक्षा जास्त जणांनी पाहिलेय. तर 25 हजारांपेक्षा जास्त जणांनी व्हिडीओला लाईक्स केलेय. कमेंट्सचाही भडीमार कऱण्यात आलाय. तुमचा डान्स आणि एनर्जी जबरदस्त आहे, असे या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने म्हटलेय. तर अन्य एका युजर्सने वय फक्त एक संख्या आहे, अशी कमेंट केली आहे. 


आणखी महत्वाच्या बातम्या : 


Trending: अमेरिकेत 2000 मुलांनी एकत्र म्हटली भागवत कथा, व्हिडीओ पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल!


Viral Video : चक्क चिमुकल्या मैनेनं केला ‘हरे कृष्णा’चा जप! व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल