Ujjain Labour Found To Be Millionaire : मध्य प्रदेशातील उज्जैन येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मजुराच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्यामुळे आयकर अधिकारी आश्चर्यचकीत झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी स्वतंत्रपणे तपास करण्यास सुरुवात केली आहे. हे संपूर्ण प्रकरण अवैध धंद्याशी संबंधित असू शकते. हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस विभागातील एका कर्मचाऱ्याला निलंबितही करण्यात आले आहे.
सापळा रचून 2 जणांनी उघडले खाते
उज्जैन येथील मोहन नगर येथे राहणारे राहुल मालवीय यांचे वडील कैलाश मालवीय हे हॉटेलमध्ये मजुरीचे काम करतात. राहुलने सत्य प्रकाश आणि सौरभ नावाच्या दोघांच्या जाळ्यात अडकून अर्धा डझन बँकांमध्ये खाती उघडली. या खात्यांमधून लाखो रुपयांचे व्यवहार होऊ लागले. यानंतर राहुलला बँकेच्या कर्मचाऱ्यांनी फोन करून व्यवहाराची माहिती दिली असता, त्याला संदर्भात माहिती नव्हती. त्यांने या संपूर्ण घटनेची तक्रार सीएम हेल्पलाइनवर केली. सीएम हेल्पलाइन सुरू झाल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. याप्रकरणी केशव नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याला राहुल मालवीय धमकावून प्रकरण मिटवले. जेव्हा हे संपूर्ण प्रकरण उज्जैनचे एसपी सत्येंद्र कुमार शुक्ला यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी केशवला निलंबित करण्यात आल्याचे उज्जैनच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले. याशिवाय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. उज्जैनच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल मालवीय नावाच्या मजुराच्या खात्यातून मोठा व्यवहार झाला आहे, ज्याची आयकर अधिकारी चौकशी करत आहेत. या व्यवहाराबाबत आयकर विभागाचे अधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे
हवाला किंवा ऑनलाइन जुगाराची रक्कम
कोटक बँक, येस बँक, एचडीएफसी बँकेसह अर्धा डझन बँकांमध्ये राहुल मालवीय यांची खाती सापडली असून त्यात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांकडून बँक स्टेटमेंट मागवण्यात आले आहे. माधवनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी मनीष लोढा यांनी सांगितले की, ही रक्कम अवैध धंद्याशी संबंधित असल्याचा संशय आहे, त्यामुळेच मजुराच्या नावाने खाते उघडून हा व्यवहार करण्यात आला आहे. बँकेचे स्टेटमेंट आल्यानंतर परिस्थिती स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम हवाला किंवा ऑनलाइन जुगाराची असू शकते.
जानेवारी महिन्यात मोठा व्यवहार
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात मोठा व्यवहार झाला होता. राहुलच्या मोबाईलवरही सतत व्यवहाराचे मेसेज येत होते, मात्र त्यांनी त्यावेळी आवाज उठवला नाही. त्याबदल्यात 23 लाख रुपये घेऊन राहुलने घर विकत घेतल्याचे सांगितले जाते, त्यानंतर सौरभ आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. सौरभने राहुलला घर आपल्या नावावर करून दिले, त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण माधवनगर पोलिसांपर्यंत पोहोचले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- PM Modi In Gujarat : पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस, 'या' कार्यक्रमांना लावणार हजेरी
- PM Modi Gujrat Visit : आईची भेट अन् जेवणाचा आस्वाद...., पंतप्रधानांच्या गुजरात दौऱ्याचे खास क्षण
- Election Result 2022 : भाजपच्या विजयानंतर PM मोदी आणि CM योगींचे आंतरराष्ट्रीय मीडियावर वर्चस्व! पाकिस्तानी मिडिया म्हणते...
- Narendra Modi: काही लोकांकडून केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न, पण भ्रष्टाचाराविरोधातील ही लढाई सुरूच राहणार: नरेंद्र मोदी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha