UP Assembly Election Result 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवून इतिहास रचला आहे. या निवडणुकीत भाजप आघाडीने 273 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. त्याचवेळी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने 111 जागा जिंकल्या. या निवडणुकीत भाजपला 41.29 टक्के मते मिळाली, तर समाजवादी पक्षाला 32.03 टक्के आणि बहुजन समाज पक्षाला 12.88 टक्के मते मिळाली.त्याच वेळी, योगी आदित्यनाथ, जे दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, त्यांनी गोरखपूर शहर विधानसभेची जागा एक लाखांहून अधिक मतांच्या फरकाने जिंकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली योगींच्या या विजयाने आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्येही जोरदार चर्चा रंगली आहे. कोण काय म्हणाले ते जाणून घ्या.


पाकिस्तानचा 'द डॉन' काय म्हणाला?


'द 'डॉन हे पाकिस्तानातील सर्वात मोठे इंग्रजी वृत्तपत्र आहे. त्यात लिहिले होते, "भारतातील सर्वात मोठ्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाचा सर्वात मोठा विजय. या निवडणुकीच्या निकालांवरून 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची झलक आणि निकालांची कल्पना येते. हिंदू राष्ट्रवादी पक्ष असलेल्या भाजपने 403 जागांपैकी निम्म्या जागा काबीज केल्या आहेत.


एक्सप्रेस ट्रिब्यूनने काय म्हटले?


दुसर्‍या पाकिस्तानी वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनने त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की, "यूपी हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. येथे भाजपच्या विजयानंतर 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत काय होणार आहे, याचा अंदाज येऊ शकतो.


अल जजीराने काय लिहिले?


मध्य पूर्वेतील सर्वात मोठी मीडिया संस्था अल जजीराने लिहिले की, "भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य असलेल्या यूपीमध्ये भाजपने पुन्हा सरकार स्थापन केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींची लोकप्रियता म्हणून या निकालांकडे पाहिले जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कट्टर हिंदू आणि मुस्लिमविरोधी प्रतिमा आहे. त्यांच्या राजवटीत राज्यात लव्ह जिहादवर षड्यंत्र म्हणून बंदी घालण्यासाठी कायदाही आणला गेला.


न्यूयॉर्क टाइम्सने काय म्हटले?
 
अमेरिकेतील प्रमुख मीडिया न्यूयॉर्क टाईम्सने लिहिले आहे की, “पीएम मोदींच्या पक्ष भाजपने भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य पुन्हा जिंकले आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, कोरोना व्हायरसमुळे देशात आर्थिक संकट असतानाही लोकांनी भगव्या पक्षाच्या बाजूने मतदान केले. या निकालांमुळे कट्टर हिंदुत्ववादी योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा आणखी मजबूत झाली आहे.


गल्फ न्यूजने काय म्हटले?
कोरोना आणि शेतकरी आंदोलनामुळे विरोधी पक्ष समाजवादी पक्षाच्या बाजूने वातावरण तयार होताना दिसत होते, पण ते चुकीचे ठरले. चार राज्यांत पूर्ण बहुमत मिळवून भाजपने 2014 मध्ये सुरू झालेली मोदी लाट अजूनही कायम असल्याचे दाखवून दिले आहे.


संबंधित बातम्या :


Mayawati on election : यावेळी मुस्लिमांनी 'ही' चूक केली, निवडणुकीत पराभवानंतर मायावतींचं मोठं वक्तव्य


UP Elections : उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा दणदणीत विजय, Yogi Adityanath सलग दुसऱ्यांदा होणार CM


UP Elections : उत्तर प्रदेशच्या निकालानंतर देशातील राजकीय समीकरणं बदलणार : ABP Majha