(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Israel Hamas War: माणसांप्रमाणे प्राण्यांवरही झाडल्या जात आहेत गोळ्या; हमासच्या सैनिकांच्या प्रवृत्तीचा व्हिडीओ पाहून थरकाप उडेल
Israel Hamas War: हमासचे सैनिक केवळ इस्रायली नागरिकांना टार्गेट करत नाहीत, तर तेथील प्राण्यांनाही अमानुषपणे गोळ्या घालून ठार करत आहेत.
srael Palestine War: इस्रायल (Israel) आणि पॅलेस्टाईन समर्थित अतिरेकी संघटना हमास (Hamas) यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून अनेक हृदय पिळवटून टाकणारे भयानक व्हिडिओ सोशल मीडियावरुन (Social Media) समोर येत आहेत. काही व्हिडिओ तर इतके भयंकर आहेत की लोक ते पाहण्याचं धाडसही करू शकत नाहीत. हमासचे सैनिक केवळ इस्रायली नागरिकांवरच गोळ्या झाडत नाहीत, तर ते तिथे असणाऱ्या प्राण्यांनाही अमानुषपणे गोळ्या घालून मारत आहेत.
सध्या ट्विटरवर एक असाच व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला इस्रायलमधील सध्याच्या परिस्थितीचा अंदाज येईल आणि इस्रायली लोकांचं जीवन कसं नरक बनलं आहे हे देखील समजेल.
काय आहे इस्रायलमधील स्थिती?
हमासचे सैनिक इस्रायली लोकांसह प्राण्यांना अत्यंत क्रूर वागणूक देत आहे. सध्या ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतून याचा अंदाज येतो. व्हिडीओमध्ये हमासचे दोन सैनिक इस्रायलमधील किबुत्झ किसुफिम येथील एका घरात घुसतात. प्रथम ते घरात फेरफटका मारुन घराची पाहणी करतात, पण त्यांना घरात कोणीही सापडत नाही.
त्यानंतर या दोन सैनिकांमधील एक सैनिक फ्रीज उघडतो आणि त्यातून एक बाटली काढतो. यानंतर तो लायटरने संपूर्ण घर पेटवतो. जेव्हा हे सैनिक घरातून बाहेर पडतात, तेव्हा घराचं रक्षण करणारा कुत्रा त्यांच्या मागे येतो आणि त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतो. तितक्यात हमासचे सैनिक कुत्र्यावर एकापाठोपाठ 3 गोळ्या झाडतात आणि यातच कुत्र्याचा मृत्यू होतो.
ภาพจาก Bodycam ของกลุ่มฮามาสเข้าสู่
— R here (@UvgtdERt4PWmcjF) October 9, 2023
Kibbutz Kissufim สุนัขพยายามไล่กลุ่มฮามาสออกไป
แต่ถูกยิง จากนั้นพวกเขาก็เข้าไปในบ้านของครอบครัว
ชาวอิสราเอล เปิดตู้เย็นแล้วจุดไฟเผาบ้าน#อิสราเอล #Israel #Gaza #ปาเลสไตน์ #กลุ่มฮามาส #ฉนวนกาซา #ปาเลสไตน์ #ฮามาส#สงครามอิสราเอล pic.twitter.com/OILDW1yBqH
युद्धात 3000 हून अधिक जणांचा मृत्यू
हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलं असेलच की सध्या इस्रायलमध्ये काय परिस्थिती आहे. तेथील लोक भीतीच्या सावटाखाली आहेत. ते किती दिवस जिवंत राहतील हेही त्याला माहीत नाही. लहान मुलं असो, वृद्ध असो की महिला, प्रत्येकाला निर्दयीपणे गोळ्या झाडल्या जात आहेत. हमासच्या सैनिकांची दहशत पाहता इस्रायलचं लष्करही सज्ज झालं आहे. 48 तासांत 3 लाखांहून अधिक लोकांना लष्करात तैनात करण्यात आलं आहे. आतापर्यंत हल्ल्यात इस्रायली नागरिक आणि पॅलेस्टिनींसह 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा: