(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Golden Boy Mummy : सोन्याचं हृदय, सोन्याची जीभ; 2300 वर्ष जुन्या ममीमध्ये सापडला खजिना, शास्त्रज्ञही अवाक्
Golden Boy Mummy : इजिप्तमधील पिरॅमिड आणि त्यातील ममी यांच्याबाबत संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत असते. आता शास्त्रज्ञांना एका 2300 वर्ष जुन्या ममीमध्ये खजिना सापडला आहे.
Golden Treasure Cairo Mummy : इजिप्तमध्ये (Egypt) प्राचीन संस्कृती आणि परंपराबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुरातत्वशास्त्रज्ञांकडून (Archaeologist) अनेक प्रकारचं संशोधन सुरु आहे. इजिप्तमधील पिरॅमिड आणि त्यातील ममी यांच्याबाबत संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत असते. आता पुरातत्व शास्त्रज्ञांना एका 2300 वर्ष जुन्या ममीमध्ये खजिना सापडला आहे. इजिप्तमधील एका ममीमध्ये सोन्याचं हृदय, सोन्याची जीभ असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर या ममीमध्ये 49 सोन्याचे तावीजही सापडले आहेत. यामुळे शास्त्रज्ञांसह सर्वांमध्ये हा कुतूहलाचा विषय ठरला आहे.
2300 वर्ष जुन्या ममीमध्ये सापडला खजिना
इजिप्शियन पिरॅमिड्सबाबत संशोधन आणि अभ्यास केला जात आहे. यामधून दरवेळी नवीन माहिती समोर येतो. आता संशोधकांना 2300 वर्ष जुन्या ममीमध्ये सोनं सापडलं आहे. हा ममी 1916 मध्ये सापडली होती, मात्र आजपर्यंत तिचा अभ्यास झालेला नाही. कैरो येथील इजिप्शियन म्युझियमच्या स्टोअर रूममध्ये ही ममी 100 वर्षांहून अधिक काळ अशीच पडून होती. आता कैरो युनिव्हर्सिटीच्या डॉ. सहार सलीम यांच्या टीमने या ममीचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला तेव्हा समोर आलेल्या या बाबींमुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.
सोन्याचं हृदय, सोन्याची जीभ
संशोधकांना 1916 मध्ये सापडलेली ही ममी एका किशोरवयीन मुलाची असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. संशोधकांचा दावा आहे की, त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याचे वय 14 ते 15 वर्षांच्या दरम्यान असेल. शास्त्रज्ञांच्या टीमने सीटी स्कॅनरच्या मदतीने या ममीचा अभ्यास केला आहे. सीटी स्कॅनरच्या मदतीने काढण्यात आलेल्या ममीच्या फोटोंमध्ये नवीन माहिती समोर आली आहे. या फोटोमध्ये दिसून आलं की, या किशोरवयीन मुलाच्या ममीमध्ये सोन्याचं हृदय, सोन्याची जीभ, तसेच 21 वेगवेगळ्या प्रकारचे 49 विविध प्रकारचे तावीज आहेत. यातील अनेक तावीज सोन्याचे आहेत.
'गोल्डन बॉय ममी'वर संशोधन सुरु
दक्षिण इजिप्तच्या एडफू भागातून संशोधकांना ही ममी सापडली होती. ही ममी 1916 मध्ये ही ममी सापडली होती. मात्र, त्यावर आता संशोधन करण्यात आलं आहे. संशोधकांना या ममीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोनं सापडल्याने या ममीला 'गोल्डन बॉय ममी' असं नाव देण्यात आलं आहे. गोल्डन बॉय ममी 1916 मध्ये सापडली होती. त्यानंतर ही ममी इजिप्तची राजधानी कैरोच्या इजिप्शियन संग्रहालयात ठेवण्यात आली होती.
ममीमध्ये सापडले 49 तावीज
दरम्यान, आता कैरो युनिव्हर्सिटीचे डॉ. सेहर यांच्या टीमने या ममीवर संशोधन सुरु केलं आहे. डॉ. सेहर यांच्या टीमने सीटी स्कॅनद्वारे या ममीची तपासणी केली. या ममीमध्ये 21 प्रकारचे 49 तावीज सापडले आहेत. ही ममी एका किशोरवयीन मुलाची असल्याचं तपासात समोर आलं आहे. विशेष म्हणजे ही ममी सुमारे 2300 वर्षे जुनी असल्याचे सांगितलं जातं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :