IPL 2022 Marathi News : लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका (Sanjiv Goenka, RPSG Group चे चेअरमन) यांचे भाऊ आणि मोठे व्यवसायिक हर्ष गोयंका यांचे एक ट्वीट सध्या चर्चेत आहे. हर्ष गोयंका यांनी आयपीएलमधील फ्लॉप ठरलेल्या सलामी फलंदाजांना उद्देशून ट्वीट केले आहे. 69 रुपयांचा ओपनर आयपीएलमधील कोट्यवधी रुपयांच्या ओपनरवर भारी पडल्याचं ट्वीट हर्ष गोयंका यांनी केले आहे. 


हर्ष गोयंका यांनी आपल्या ट्वीटमध्ये एकीकडे मुंबईचा सलामी फलंदाज ईशान किशन याचा फोटो पोस्ट केलाय तर दुसरीकडे कॉर्कस्क्रू ओपनरचा फोटो पोस्ट केलाय. तसेच या फोटोवर त्यांनी लिहिलेय की, 69 रुपयांचा ओपन ईशान किशन, देवदत्त पडिक्कल आणि यशस्वी जायस्वाल यांच्यावर भारी पडलाय.  आपल्या ट्वीटमध्ये हर्ष गोयंका यांनी लिहिलेय की, हा ओपनर 69 रुपयांना येतोय आणि 15.25 कोटी रुपयांच्या ईशान किशन, 7.75 कोटींच्या देवदत्त पडिक्कल आणि चार कोटीच्या यशस्वी जायस्वलपेक्षा जास्त उपयोगी पडत आहे.  #IPL.. हर्ष गोयंका यांचे हे ट्वीट व्हायरल झालेय. लोकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काही नेटकऱ्यांनी यावर काही मिम्सही पोस्ट केले आहेत. 


ईशान किशन, देवदत्त पडिक्कल आणि यशस्वी जायस्वल यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. हे तिन्हीही फलंदाज अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीकास्त्र सोडले जात आहे.


This opener comes at Rs 69 and is more useful than the Rs 15.25cr Ishan Kishan, Rs 7.75cr Devdutt Padikkal and Rs 4cr Yashasvi Jaiswal. #IPL pic.twitter.com/zwiHmrTpMH


April 29, 2022चा 15 वा हंगाम या तिन्ही खेळाडूसाठी खराब राहिलाय. जायस्वल याला तर संघातून वगळण्यात आले. 


ईशान किशनला मुंबई इंडियन्सने 15.5 कोटी रुपये खर्च करत संघात घेतलं होतं. ईशान किशन यंदाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. ईशान किशनला आतापर्यंत आठ सामन्यात फक्त 199 धावा करता आल्या आहेत. ईशान किशन याने सुरुवातीच्या सामन्यात दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्यानंतर त्याला आपल्या कामगिरीत सातत्या राखता आले नाही. पडिकल यालाही आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. पडिक्कल याला आठ सामन्यात दोनशेही धावा काढता आल्या नाहीत. तर जायस्वाल याला तीन सामन्यात 25 धावाच करता आल्या.