Trending Video : सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. नुकताच असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून युजर्स चांगलेच थक्क झाले आहेत. व्हिडीओमध्ये वाघ गायीच्या वासराच्या मागे धावताना दिसत आहे. मात्र, त्यानंतर चक्क वासरुच वाघाच्या मागे धावताना दिसत आहे.


आजकाल सोशल मीडिया प्राण्यांच्या व्हिडीओ अधिक व्हायरल होतात. या व्हिडीओंमुळे नेटकऱ्यांचं चांगलंच मनोरंजन होतं. नुकताच असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो जोरदार व्हायरल होत आहे.  व्हिडीओमध्ये एक गायीचं वासरू धावताना धावताना दिसत आहे. त्याच्यामागे एक वाघ धावताना दिसत आहे.







धावत असताना अचानक गायीचे वासरू जाळीवर आदळल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर कोणाला काही समजण्याच्या आधी वासरू उठून वाघाच्या मागे लागून त्याची पाठ काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. वाघ जंगलात इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात. मात्र, या व्हिडीओमध्ये गायीच्या वासरापासून जीव वाचवून पळणारा वाघ पाहून तुम्हीही नक्कीच थक्क व्हाल.


लहानपणापासूनच वन्यजीव अभयारण्यात एकत्र वाढल्यामुळे वाघ आणि बछडा दोघेही मित्र असावेत, असा अंदाज सध्या वर्तवला जात आहे. त्यामुळे ते एकमेकांसोबत मस्ती करताना दिसतात. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :