Trending News : आजकाल सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळतात. मग ते व्हिडीओ पाळीव प्राण्यांचे असो वा जंगली प्राण्यांचे, असे व्हिडीओ वेगानं व्हायरल होतात आणि चर्चेत येतात. या व्हिडीओंमुळे नेटकऱ्यांचं चांगलंच मनोरंजन होतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक सिंह पर्यटकांच्या वाहनामध्ये घुसताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून काही वेळासाठी तुमच्याही अंगावर काटा येईल एवढं मात्र नक्की.


सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. जंगलामध्ये कोणताही प्राणी सिंहांच्या समोर येत नाही. सिंहाच्या नजरेपासून प्रत्येक प्राणी वाचण्याचा प्रयत्न करतो. अनेक प्राणी सिंहाची डरकाळी ऐकूनही धूम ठोकतात. इतकंच नाही तर माणसांनाही सिंहाला पाहून अंगावर काटा येतो. अशातच जर तुमच्या समोर अचानक सिंह आला तर काय होईल. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.






                              


व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक सिंह पर्यटकांच्या वाहनामध्ये शिरतो, हे पाहून तुमचाही थरकाप उडेल. हा सिंह पर्यटकांच्या वाहनात घुसल्यानंतर एका पर्यटकाच्या अंगावर जाऊन त्याला मिठी मारताना दिसत आहे. हा व्हिडीओपाहून प्रत्येक जण आश्चर्यचकीत झाला आहे. व्हिडीओमध्ये पर्यटक सिंहाची पाठ थोपटताना दिसत आहेत.


सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत सुमारे 8 लाखहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, अनेक नेटकरी या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कुणी या सिंहाला गोंडस म्हटलं आहे. दुसरीकडे या सिंहाला भूक लागली असती तर काय झालं असतं, असा सवाल एका नेटकऱ्याने उपस्थित केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :