Trending Video : बंगळुरूच्या एका हॉटेलमध्ये चक्क एका कुत्र्याला नोकरी देण्यात आली आहे. बर्नी हा एक कुत्रा आहे ज्याला त्याच्या मालकानं सोडून दिलं होतं. त्यावेळी बर्नीसमोर कुठं जायचं हा प्रश्न उभा होता. त्यावेळी बंगळुरूमधील एका पंचतारांकित हॉटेलने (5 स्टार हॉटेल) बर्नीसाठी आपले दरवाजे उघडले शिवाय त्याला रोजगारही दिला. ऐकून नवल वाटलं ना?


जेव्हा बर्नी 'द ललित अशोक बंगळुरू' हॉटेलला आला तेव्हा तो खूप घाबरलेला आणि एकाकी होता. पण हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला मनापासून स्वीकारलं आणि त्याला नोकरीही दिली. त्यांनी बर्नीला एक ओळखपत्र देखील दिलं. या आयडीवर बर्नीचं पद Chief Happiness Officer असं आहे. बर्नीने लवकरच हॉटेलच्या कर्मचार्‍यांशी मैत्री केली आणि ललित अशोक बंगळुरूचा आवडता कर्मचारी बनला. तो हॉटेलमध्ये सर्वांचे स्वागत करतो आणि त्यांच्यासोबत खेळून, मिठी मारून कर्मचाऱ्यांचा थकवा दूर करतो.


हॉटेलचे जनरल मॅनेजरने सांगितलं की, बर्नी हॉटेलमध्ये असणे हा एक अद्भुत अनुभव आहे. तो आमच्या पाहुण्यांना आणि कर्मचार्‍यांना हसवतो. पाहुणे त्यांच्या हॉटेलच्या मुक्कामावेळी बर्नीसोबत फिरणे, जेवण करणे आणि हँग आउट करणं निवडू शकतात.  बर्नी नेहमी सर्वांना मिठी मारण्यासाठी तयार असतो आणि हॉटेलमध्ये पाहुण्यांचे मनापासून स्वागत करतो.






 


या कुत्र्याचा पगार किती आहे?
बर्नीला नियमित कर्मचार्‍याप्रमाणे पगार दिला जातो. परंतु पगाराच्या रूपात, त्याला भरभरून प्रेम दिलं जातं.


बर्नी दिवसभर काय करतो?
बर्नी वेळेवर कामावर हजर होतो. हॉटेलचे कर्मचारी त्याचा आयडी त्याच्या गळ्यात लटकवतात. व्यस्त आणि थकलेल्या कर्मचाऱ्यांना सांत्वन करण्यासाठी तो शेपूट हलवतो आणि त्यांनी मिठी मारतो. तो हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचा लाडका आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या