Viral Video : सध्या तरुणाईच्या डोक्यात स्टंटबाजीची क्रेझ झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्याच वेळी, थरारक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहेत. स्टंटचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर यूजर्सना रोमांचित करताना दिसत आहेत. नुकताच असाच एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जे पाहून सगळेच थक्क झाले आहेत.


अलीकडच्या काळात लोक त्यांचे अप्रतिम कारनामे करताना दिसतात. जे पाहून युजर्सचे डोळे पाणावले. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ब्राझीलचा माणूस राफेल जुग्नो ब्रिडी 6,326 फूट उंचीवर दोन गरम Air bubble च्या मध्ये बांधलेल्या दोरीवर चालताना दिसत आहे.






एवढेच नाही तर, राफेल जुग्नो ब्रीदीने जमिनीपासून 1901 मीटर उंचीवर चालत विश्वविक्रम करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (GWR) नाव नोंदवले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, राफेल 18 मीटर किंवा 59 फूट अंतरावर दोन हॉट एअर बलूनमध्ये बांधलेल्या स्लॅकलाईनवर चालताना दिसत आहे. 


गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, राफेलने आकाशातून इतक्या उंचीवर जात असताना स्लॅकलाईन ओलांडली, जी जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाच्या दुप्पट आहे. व्हायरल व्हिडीओवर यूजर्स सतत त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसतात. या व्हिडीओला जवळपास 9 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha