(Source: ECI/ABP News/ABP Majha)
R Praggnanandhaa: बुद्धिबळपटू प्रज्ञानंदला मिळणार आलिशान इलेक्ट्रिक कार गिफ्ट; आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा
R Praggnanandhaa: महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे तरुण बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंदच्या पालकांना इलेक्ट्रिक कार भेट देणार आहेत.
चेन्नई: भारताचा ग्रँडमास्टर रमेशबाबु प्रज्ञानंदने (Rameshbabu Praggnanandhaa) बुद्धिबळ विश्वचषकात आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. जगातील नंबर 1 बुद्धिबळ खेळाडू मॅग्नस कार्लसनविरुद्धच्या सामन्यात प्रज्ञानंदने (Praggnanandhaa) चांगलीच लढत दिली. बुद्धिबळ विश्वचषकात 18 वर्षाच्या अवलियाने 32 वर्षांच्या कार्लसनला दिलेल्या जबरदस्त आव्हानामुळे जगभरातून प्रज्ञानंदचं कौतुक होत आहे. कार्लसनविरुद्धच्या अंतिम सामन्यात प्रज्ञानंदला पराभवाचा सामना पत्करावा लागला, तो चॅम्पियन होण्यापासून फक्त एक पाऊल दूर होता. जगपातळीवरील त्याच्या या अमूल्य कामगिरीवर महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) देखील प्रभावित झाले आणि त्यांनी प्रज्ञानंदच्या कुटुंबाला आलिशान कार भेट देण्याचा निर्णय घेतला.
महिंद्रा ग्रुपकडून मिळणार आलिशान कार गिफ्ट
प्रज्ञानंदच्या धमाकेदार कामगिरीनंतर महिंद्रा ग्रुपचे मालक आनंद महिंद्रा यांनी प्रज्ञानंदच्या पालकांना आलिशान इलेक्ट्रानिक कार (EV) भेट देण्याची घोषणा केली आहे. प्रज्ञानंद याला महिंद्रा ग्रुपकडून XUV 400 ईव्ही कार देण्यात येणार आहे. जागतिक दर्जावरील खेळांत देशाचं नाव उज्जवल करणाऱ्या खेळाडूंना महिंद्रा ग्रुप प्रोत्साहन देत आहे. जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन मॅग्नस कार्लसनविरोधातील धमाकेदार खेळात या इवल्याशा मुलाने उत्तम कामगिरी दाखवली, यासाठी प्रज्ञानंदला इलेक्ट्रॉनिक कार (EV) भेट देण्यात येत आहे.
ट्विटर युजर्सच्या मागणीनंतर आनंद महिंद्रांचा प्रतिसाद
आता हा सर्व घाट घातला गेला तो म्हणजे ट्विटरवरील असंख्य लोकांनी आनंद महिंद्रा यांना केलेल्या विनंतीमुळे. असंख्य ट्विटर युजर्सने महिंद्राच्या अध्यक्षांना प्रज्ञानंदला थार (Thar) भेट देण्याची विनंती केली होते. यानंतर महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विटर युजर्सच्या विनंतीला प्रतिसाद दिला.
महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, "कृशले आणि तुझ्यासारख्या अनेकांच्या भावनांचा मी आदर करतो, तुम्ही सगळे मला प्रज्ञानंदला थार गिफ्ट करण्याची विनंती करत आहात. पण माझ्याकडे आणखी एक कल्पना आहे... मी सर्व पालकांनी यासाठी प्रोत्साहित करू इच्छितो की, त्यांनी त्यांच्या मुलांना बुद्धिबळ आणि यासारखे विविध खेळ खेळण्यासाठी प्रेरित करावं (व्हिजीओ गेम खेळण्याऐवजी). ही ईव्ही प्रमाणेच तुमच्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक असेल. आणि म्हणूनच मला वाटतं की, प्रज्ञानंदचे पालक श्री रमेशबाबू आणि श्रीमती नागलक्ष्मी यांना मी XUV4OO EV कार भेट देऊ इच्छितो. आपल्या मुलाची आवड जोपासल्याबद्दल आणि त्याला अथक पाठिंबा दिल्याबद्दल ते आमच्या कृतज्ञतेला पात्र आहेत.”
Appreciate your sentiment, Krishlay, & many, like you, have been urging me to gift a Thar to @rpragchess
— anand mahindra (@anandmahindra) August 28, 2023
But I have another idea …
I would like to encourage parents to introduce their children to Chess & support them as they pursue this cerebral game (despite the surge in… https://t.co/oYeDeRNhyh pic.twitter.com/IlFIcqJIjm
यावर ट्विटर युजर्सने महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचे आभार देखील मानले आहेत, सोबतच प्रज्ञानंद याचं अभिनंदन देखील केलं आहे.
हेही वाचा:
Toyota Rumion launched: टोयोटा रुमियन एमपीव्ही भारतात लाँच; पाहा किंमत, फोटो आणि वैशिष्ट्यं