Bullet Price in 1986 : इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल याचा खरंच नेम नाही. ते म्हणतात इंटरनेट एक मायाजाल आहे. ते कधीकधी व्हायरल आणि ट्रेंडिंग होणाऱ्या गोष्टी पाहून खरंच वाटतं. बऱ्याचदा इंटरनेटवर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर कधी काही फोटो. काही दिवसांपूर्वी 1985 मधील एका हॉटेलचं बील व्हायरल झालं होतं. तर त्यानंतर 1937 मधील एका सायकलचं बील व्हायरल झालं होतं. हे बील पाहून नेटकरी चक्रावले होते. तर या बील्सची मोठी चर्चाही रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. सध्या असंच एक बील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हे बील एखाद्या सायकलचं किंवा रेस्टॉरंटचं नसून, हे बील आहे एका बुलेटचं. व्हायरल होणाऱ्या या बीलनं बुलेटप्रेमींना आश्चर्यचकीत करुन सोडलं आहे. 


आजही बुलेटचा आवाज आला की, अनेकांच्या नजरा त्या आवाजाच्या दिशेला खिळतात. सध्याच्या स्पोर्ट्स बाईकच्या युगातही बुलेटनं आपलं वेगळं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. सध्या बुलेटची बाजारातील किंमत दीड ते दोन लाखांच्या पुढेच आहे.  अनेक तरुण ज्यावेळी बाईक घेण्याचा विचार करतात, तेव्हा त्यांची पहिली पसंती ही बुलेटच असते. पण तुम्हाला माहीत आहे का? आजपासून 20 ते 25 वर्षांपूर्वी याच बुलेटची किंमत किती होती? आजपासून तब्बल 37 वर्षांपूर्वी म्हणजेच, 1986 मध्ये आजची लाखोंच्या घरात असणारी बुलेट फक्त आणि फक्त 19 हजार रुपयांना मिळत होती.   






काय बसला ना धक्का? तुम्हाला आवडणारी आणि सध्या लाखोंमध्ये किंमत असणारी बुलेट फक्त 19 हजार रुपयांना मिळत होती. अजुनही तुमचा विश्वास बसत नसेल, तर हे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं बील पाहा. यामध्ये Bullet 350cc ची किंमत फक्त 18,700 रुपये असल्याचं लिहिलंय. दरम्यान, सध्या बाजारात 'रॉयल एनफिल्ड बुलेट 350 सीसी'ची सुरुवातीची किंमत 1.60 लाख रूपये इतकी आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे बील 23 जानेवारी 1986 मधील आहे. तसेच, हे बील झारखंडमधील कोठारी मार्केटमध्ये असणाऱ्या एका अधिकृत डिलरचं असल्याचं सांगितलं जात आहे. बीलवर लिहिलेल्या माहितीनुसार, 1986 मध्ये  'रॉयल एनफिल्ड बुलेट 350 सीसी'ची ऑनरोड किंमत 18,800 रुपये होती. जी डिस्काउंटसह 18,700 रुपयांना विकली गेली. 


बुलेटच्या या बिलचा फोटो 13 डिसेंबर रोजी इंस्टाग्राम पेज royalenfield_4567k वर पोस्ट करण्यात आला होता. कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, Royal Inn Field 350cc in 1986. या पोस्टला आतापर्यंत 58 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर युजर्सनी भरभरून प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका व्यक्तीनं लिहिलंय की, आता एवढ्या पैशांमध्ये बुलेटची फक्त रिम्स येतात. तर, दुसऱ्या युजरनं लिहिलंय की, आता माझी बाईक एका महिन्यात एवढं तेल वापरते. तिसऱ्या यूजरनं लिहिलंय की, आज इतक्या रुपयांचा बुलेटचा एक महिन्याचा हप्ताच आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Electric Bullet: फक्त 1.5 लाख रुपयात खरेदी करू शकता इलेक्ट्रिक बुलेट, देते 150 किमीची रेंज


Car loan Information:

Calculate Car Loan EMI