NASA Recruited Volunteers to Spend Two Months in Bed : बेडवर पडून राहण्यासाठी तुम्हाला लाखो रुपये मिळाले तर... इतकंच नाही तर तुम्ही संशोधनासाठी शरीरातील काही घटक विकूनही तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. अमेरिकन संशोधन संस्था नासाची (NASA) ही भन्नाट ऑफर आहे. नासाकडून मानवी शरीरावर संशोधन सुरु आहे. या संशोधनासाठी नासा स्वयंसेवकांची भरती करण्यात आली आहे. 


जर तुम्हाला विज्ञान, संशोधनात योगदान द्यायचे असेल आणि पैसेही कमवायचे असतील तर तुमच्यासाठी ही चांगली संधी ठरु शकतो. तुम्ही तुमच्या शरीरातील काही घटक विकूनही पैसे कमावू शकता. नासाने एका संशोधनासाठी काही लोकांचीही नियुक्तीही केली होती. या लोकांचे काम फक्त दोन महिने बेडवर पडून राहणे होते. नासा मानवी शरीरावर संशोधन करते आणि त्या बदल्यात स्वयंसेवकांना मोबदलाही दिला जातो.


कृत्रिम गुरुत्वाकर्षणाचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो यावर नासाकडून संशोधन करण्यात आले. यासाठी काही लोकांची भरती करण्यात आली होती. या लोकांचे काम फक्त खाटेवर लोळत राहणे एवढेच होते. दोन महिने हे लोक नासाच्या संशोधनासाठी देखरेखीखाली राहिले आणि त्यांना यासाठी सहभागी स्वयंसेवकांना 18,500 अमेरिकन डॉलर म्हणजेच 14.8 लाख रुपये देण्यात आले.


पण 'हे' काम सोपे नव्हते


नासाच्या संशोधनासाठी बेडवर फक्त पडून राहणे वाटते तितके सोपे नव्हते. निवडलेल्या 24 लोकांनी 60 दिवस बेडवर पडून राहिले. त्यांच्या त्याचं स्थितीत म्हणजे झोपूनच भोजन आणि विश्रांती अशी सर्व कामे करायची होती. 


संशोधनासाठी मदत करुन पैसे कमावण्याची संधी


वैज्ञानिक संशोधनासाठी मदत करुन पैसे कमावण्याची संधी आहे. याद्वारे वैज्ञानिक संशोधनाला मदत केली जाऊ शकते आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसे देखील मिळू शकतात. हा मार्ग थोडा वेगळा पण आकर्षक आहे. शकतात. 


60 दिवस बेडवर पडून राहणे


यासाठी नासा 18,500 तुम्हाला देईल. पण तुम्हाला दोन महिने बेडवर पडून राहावे लागेल. तुम्हाला दोन महिने नासासोबत राहावे लागेल. या संशोधनामुळे शास्त्रज्ञांना अंतराळवीरांच्या शरीरात अंतराळ उड्डाण करताना वजनहीनतेमुळे होणारे बदलांचे निरीक्षण केले जाते. या संशोधनासाठी स्वयंसेवकांचीची निवड आधीच झाली आहे. या लोकांची निवड करताना त्यांची शारीरिक आणि मानसिक वैशिष्ट्ये अंतराळवीरांसारखीच आहेत हे लक्षात ठेवून नंतरच निवड केली जाते.


फक्त झोपून लाखो रुपयांची कमाई करणे सोपे नाही


दोन महिन्यात फक्त झोपून लाखोंची कमाई करणं जर तुम्हाला सोपं वाटत असेल तर, असं मुळीच नाही. तुम्हाला झोपताना डोकं सहा अंश खाली ठेवावं लागतं. तुम्ही जेवताना किंवा टॉयलेट वापरत असतानाही तुम्हाली हे करावे लागते. नासाच्या बेड रेस्ट स्टडीसाठी संशोधन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ रॉनी क्रॉमवेल म्हणतात की, आम्ही अशा लोकांची निवड करतो जे दोन महिने अंथरुणावर घालवण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहेत. हे प्रत्येकासाठी सोयीस्कर नाही. प्रत्येकजण अंथरुणावर जास्त काळ टिकू शकत नाही.


तुमच्या रक्तातील प्लाझ्मा विकला जाऊ शकतो


तुम्ही तुमचा रक्त प्लाझ्मा (Blood Plasma) देखील विकू शकता, ज्यासाठी सुमारे 50 डॉलर म्हणजे 4000 रुपये दिले जातात. प्लाझ्मा हा मानवी रक्ताचा सर्वात मोठा घटक आहे. याचा रक्त गोठण्याच विकार, स्वयंप्रतिकार रोग आणि बर्न्सच्या उपचारांमध्ये वापर केला जातो. DonatingPlasma.org नुसार, प्लाझ्मा दानाला 'Gift Of Life' असेही म्हणतात.