Silverline Electric Bikes: देशात आता मोठ्या प्रमाणात लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत आणि यामध्ये दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांना सर्वाधिक मागणी आहे. यासाठी Ola, Hero, Okinawa आणि Ather सारख्या अनेक ब्रँडने त्यांच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे अनेक मॉडेल बाजारात आणले आहेत. पण तरीही लोक अजूनही बाजारात रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) आणि स्प्लेंडर सारख्या सर्वाधिक पसंतीच्या बाईक्सची वाट पाहत आहेत. यांचे इलेक्ट्रिक व्हेरियंट कधी येणार आहे सांगता येत नाही. मात्र आपल्या देशात प्रत्येक गोष्टीचा जुगाड आहे. जर तुम्हाला रॉयल एनफिल्ड सारखी बाईक इलेक्ट्रिक अवतारात घ्यायची असेल तर बिहारमधील कंपनी तुमचा हा छंद पूर्ण करू शकते. ही कंपनी बाजारात उपलब्ध असलेल्या काही लोकप्रिय बाईक्स त्यांच्या वेबसाइटवर इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बदलून विकत आहे, ज्या तुम्ही खरेदी करू शकता.
Electric Royal Enfield Bullet : इलेक्ट्रिक रॉयल एनफिल्ड बुलेट
इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बाईक बनवणाऱ्या कंपनीचे नाव सिल्वरलाइन आहे. कंपनी आपल्या वेबसाइटवर रॉयल एनफील्ड बुलेटला (Electric Royal Enfield Bullet ) इलेक्ट्रिक बाईक म्हणून विकत आहे. याला 'लव्ह प्लस', असे नाव देण्यात आले आहे. या बाईकमध्ये 72V/48AH बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. जे एकदा चार्ज करून 150 किलोमीटरपर्यंत धावू शकते. याची टॉप स्पीड 120 किलोमीटर प्रति तास आहे. तुम्ही ही बाईक फक्त 2,000 रुपयांमध्ये बुक करू शकता. कंपनीने याची किंमत 1,51,999 रुपये निश्चित केली आहे.
Hero Passion Pro Electric: हिरो पॅशन प्रो इलेक्ट्रिक
ही कंपनी 'अग्नी प्लस' नावाच्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये Hero Passion Pro देखील विकते. बाईकला 72V/48AH बॅटरी पॅक देखील मिळतो, जो या बाईकला 150 किमी पर्यंतची रेंज देतो. याचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. ही बाईक 2000 रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते. तर याची किंमत 1,25,999 रुपये ठेवण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीने आपल्या वेबसाइटवर यामाहाच्या R 15 आणि अनेक इलेक्ट्रिक वाहनांसह इतर अनेक लोकप्रिय बाईक्स सूचीबद्ध केल्या आहेत. कंपनीकडे सर्वात कमी किमतीसह स्लो स्पीड मोपेड आहे, ज्याची किंमत फक्त 56,000 रुपये आहे आणि याची रेंज प्रति चार्ज 70 किलोमीटर आहे.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी:
Car Loan: कार चोरीला गेली तरी लोन भरावाच लागणार, मात्र हे काम केल्यास EMI पासून होऊ शकते सुटका
Car loan Information:
Calculate Car Loan EMI