Intresting Fact About ATM PIN : आजकाल डिजिटल व्यवहारांमुळे व्यवहार करणे फारच सोपे झाले आहे. पूर्वी लोकांना पैसे काढण्यासाठी बँकेत लांबच लांब रांगेत तासनतास ताटकळत उभे राहावे लागत होते, पण आज काळ बदलला आहे. एटीएम (ATM) सुविधा सुरू झाल्याने लोकांना बँकांच्या फेऱ्या मारण्यापासून दिलासा मिळाला आहे. आता लोक डिजिटलायझेनकडे वळले आहेत. तुम्हाला जेव्हा पैशांची गरज असेल तेव्हा तुम्ही एटीएम मशीनमधून पैसे काढता. एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला त्यात तुमचा 4 अंकी पिन टाकावा लागतो. मात्र, एटीएम पिनमध्ये फक्त चारच क्रमांक का असतात? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? एटीएम पिन 4 अंकांपेक्षा जास्त असू शकतो का? याच विषया संदर्भात माहिती जाणून घ्या.
4 अंकी पिन का असतो?
आज जरी तुम्ही एटीएम मशिनमधून 4 अंकी पिन टाकून पैसे काढत असलात तरी प्रत्यक्षात मात्र, सुरुवातीला 6 अंकी पिन असायचा. याचं कारण सुरक्षिततेच्या दृष्टीने 4 पेक्षा 6 अंकी पिन चांगला होता. मात्र, यामुळे एक अडचण निर्माण होऊ लागली की लोक त्यांचा पिन नंबर सतत विसरू लागले. यामुळे 4 अंकी पिन ठेवण्यात आला. मात्र, आता 6 डिजीट पिन कुठेही वापरला जात नाही असे नाही. तर, जगातील अनेक देशांमध्ये आजही 6 डिजीट एटीएम पिन आहे. आपल्या देशातील अनेक बँका आपल्या ग्राहकांना 6 क्रमांकाचा पिन तयार करण्याची सुविधाही देतात. 6 अंकी पिन ठेवल्याने दुसर्या व्यक्तीला कोणाचा पिन पटकन आठवत नाही तसेच, यामुळे अकाऊंट हॅक होण्याची समस्याही वाढणार नाही.
6 अंकी पिन अधिक सुरक्षित
4 अंकी पिन 0000 ते 9999 दरम्यान असतात. याद्वारे 10000 वेगवेगळे पिन नंबर ठेवता येतात, ज्यामध्ये 20% पिन हॅक केले जाऊ शकतात. त्यामुळे 6 अंकी पिन हा 4 अंकी पिनपेक्षा अधिक सुरक्षित मानला जातो.
ATM चा शोध कोणी लावला?
एटीएम मशीनचा शोध 1969 साली लागला. याचा शोध स्कॉटिश शास्त्रज्ञ जॉन एड्रियन शेफर्ड बॅरॉन यांनी लावला होता. त्यांचा जन्म भारताच्या ईशान्य भागात असलेल्या शिलाँग शहरात झाला होता. जॉन एड्रियन शेफर्ड बॅरॉन यांनी लावलेल्या या शोधामुळे लोकांचा व्यवहार अधिक सोयीचा झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :