Viral Video : मैत्री हे नातंच वेगळं असतं. रक्ताचं नात नसताही आपले मित्र-मैत्रिणी अनेक वेळा आपल्यासोबत खंबीर उभं असल्याचं पाहायला मिळतं. अशी दोस्ती, यारीवर अनेक चित्रपटही बनले आहेत. अगदी शोले चित्रपटातील जय वीरूच्या दोस्तीची मिसाल दिली जाते. सध्या सोशल मीडियावर अशाच एक मैत्रीची व्याख्या सांगणार व्हिडीओ व्हायरल होत आहे.


व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका दिव्यांग तरुणाला दोन तरुणी खांद्यावर घेऊन फिरताना दिसत आहेत. या व्हायरल झालेला व्हिडीओ केरळमधील आहे. या व्हायरल व्हिडीओमधील तरुणाचं नाव अलिफ मोहम्मद असं आहे. या व्हिडीओमध्ये अलिफला त्याच्या दोन मैत्रिणी खांद्याचा आधार घेऊन कॅम्पसमध्ये चालताना दिसत आहेत. हा व्हिडीओ कोल्लम जिल्ह्यातील सस्थमकोट्टा येथील डीबी कॉलेजच्या कॅम्पसमधील आहे.


केरळमधील अलिफ मोहम्मद जन्मत:च दिव्यांग आहे. अलिफला जन्मापासूनच पाय नाहीत. मात्र, त्याचे मित्र-मैत्रिणी त्याला या गोष्टीची कमतरता जाणवू देत नाहीत. त्याचा दोन मैत्रिणी त्याला नेहमीच शाळा-कॉलेजमध्ये खांद्यावर सोबत घेऊन फिरतात. अलिफ बीकॉमच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे. तो कोल्लम जिल्ह्यातील सस्थमकोट्टा येथील डीबी कॉलेजमध्ये शिकत आहे.






 


अलिफचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे कळल्यानंतर त्यालाही आश्चर्याचा धक्का बसला. अलिफने सांगितले की, या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दोन तरुणी त्याच्या मैत्रिणी आहेत. त्या नेहमी त्याला कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फिरण्यास मदत करतात. त्याचे मित्रमैत्रिणी त्याला कॅम्पसमध्ये खांद्यावर घेऊन फिरवतात. एकीकडे काही लोक धर्माच्या नावावर समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे हा व्हिडीओ सर्व जाती, धर्माच्या पलिकडील भावना आणि प्रेम पसरवत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha