Bucha Massacre : युक्रेनच्या बुचा शहरातील नरसंहाराची रोज नवनवीन फोटो समोर येत आहेत. युक्रेनच्या प्रॉसिक्युटर जनरलच्या कार्यालयाच्या वृत्तानुसार सांगिण्यात आलं आहे की, बुचा येथील चर्चजवळील सामूहिक कबरीत 67 मृतदेह पुरलेले आढळले आहेत. रशियन सैन्याने माघार बुचा येथून मागे परतल्यानंतर पत्रकार आणि युक्रेनियन बुका येथे गेले तेव्हा सामूहिक कबरीचा शोध लागला. हे मृतदेह बाहेर काढल्यावर ते काळ्या पिशव्यांमध्ये चिखलात रांगेत ठेवले होते. यातील बहुतांश मृतदेहांवर गोळ्यांच्या खुणा आढळून आल्या आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार, ही स्मशानभूमी 45 फूट लांब असल्याची माहिती आहे.


प्रॉसिक्युटर जनरल इरिना वेनेडिक्टोव्हा यांनी शुक्रवारी सांगितले की, 'आतापर्यंत 18 मृतदेह सापडले आहेत, ज्यात 16 जणांवर गोळ्या झाडल्याच्या खुणा आहेत आणि इतर दोन मृतदेहांवर गोळ्या आणि धारदार शस्त्राने झालेल्या जखमा आहेत. याचा अर्थ युक्रेनच्या नागरिकांवर गोळीबार करण्यात आला.' युरोपियन कमिशनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांनी शुक्रवारी बुचा येथील पाहणी केली. त्यांनी सांगितले की नागरिकांच्या हत्त्या रशियाच्या हल्ल्यांचं भयानक वास्तव दाखवतात. यातून पुतिन यांच्या रशियन लष्कराचा भीषण चेहरा दिसून येतो. प्रॉसिक्युटर जनरलचे कार्यालय या नागरिकांच्या मृत्यूंची चौकशी करत आहे. यामध्ये युद्ध आणि गुन्ह्यांशी संबंधित इतर प्रकरणांचा समावेश आहे.


इरिना वेनेडिक्टोव्हा यांनी सांगितले की, युरोपियन संघ देखील या तपासात सहभागी आहेत. दुसरीकडे मॉस्कोने बुचामध्ये रशियन सैनिकांनी नागरिकांची हत्या केल्याचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागरिकांवर हल्ले होत असताना युक्रेनमधील अनेक भाग रशियाच्या ताब्यात आहेत. 


युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात रशियन सैन्याने बुचा शहरातून माघार घेतल्यानंतर शेकडो नागरिक मृतावस्थेत सापडले होते. नागरिकांच्या मृतदेहांचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. बुचाचे उपमहापौर तारास शाप्रोस्की यांनी शुक्रवारी सांगितले की 360 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि 260 ते 280 मृतदेह स्थानिकांनी सामूहिक कबरीत दफन केले होते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha