Jammu Kashmir Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. अनंतनागच्या सिरहामामध्ये चकमक सुरू आहे. येथे एक ते दोन दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. तर दुसरी चकमक कुलगाम जिल्ह्यातील हाजीपोराच्या दमहलमध्ये येथे सुरू आहे. येथेही दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण काश्मीरमधील अनेक भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. अलीकडेच, बुधवारी पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत अन्सार गजवतुल हिंद आणि लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनांचे दोन दहशतवादी मारले गेले होते.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सार गजवतुल हिंदचा सफात मुझफ्फर सोफी उर्फ मुआविया आणि लष्करचा उमर तेली उर्फ तल्हा अशी मारले गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला श्रीनगरमधील खोनमोह भागातील सरपंचाच्या हत्येसह इतर अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये हे दोघेही वाँटेड होते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, दोन्ही दहशतवाद्यांनी अलीकडेच त्रालमध्ये तळ बनवला होता.
लष्कराने सोमवारी सांगितले होते की, जम्मू आणि काश्मीरमध्ये 172 दहशतवादी सक्रिय आहेत, त्यात 79 परदेशी दहशतवादी आहेत. या दहशतवाद्यांमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच दहशतवादात सामील झालेल्या 15 स्थानिक तरुणांचा समावेश असल्याचेही लष्कराने म्हटले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mumbai Vaccination : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आठवडाभरात महानगरी 100 टक्के लसवंत...
- कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवर आता पुन्हा पंतप्रधान मोदींचा फोटो येणार, सूत्रांची माहिती
- Corona Vaccine : नोव्हॅक्सच्या कोरोना लसीला आपातकालीन वापरासाठी DCGI ची मंजुरी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha