2000 Kids Chanted Bhagavad Gita Trending News : जगभरात भारतीय संस्कृतीचा बोलबाला आहे. भारतातील धार्मिक स्थळे पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक विदेशातून येतात. मथुरा-वृंदावन आणि ऋषिकेशमध्ये परदेशी पर्यटकांचा ओघ आहे. त्याचबरोबर केवळ भारतातच नाही तर परदेशातही भारतीय संस्कृतीची झलक पाहायला मिळते.


भारतीय संस्कृतीचा बोलबाला; अमेरिकेतून नुकताच एक व्हिडीओ समोर
जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेतून नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून येईल. यासाठी हा व्हिडीओ एकदा जरूर पाहा. सोशल मीडियावरून समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक मोठे इनडोअर स्टेडियम दिसेल. या स्टेडियममध्ये हजारो मुले एकत्र भगवद्गीतेचे पठण करत आहेत. 2 हजार मुलं मिळून भागवत कथेचं पठण करत असल्याचं या व्हिडीओत पाहता येईल. खरंच हे दृश्य अप्रतिम आहे.


 




 


वर्षभरापासून तयारी 
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हायरल व्हिडीओ अमेरिकेतील डलास येथील आहे. येथे मुलांनी मिळून भागवत कथा सांगितली. व्हिडीओवर दिलेल्या कॅप्शननुसार, ही मुले गेल्या एक वर्षापासून यासाठी तयारी करत होती. त्याचबरोबर भागवत पठण करून त्यांनी भारतीय संस्कृतीचे मूल्य जगभरात वाढवले ​​आहे.


व्हायरल व्हिडीओ


हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर RVAIDYA2000 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. 16 ऑगस्ट रोजी शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 4 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओला 12 हजारांहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे.


पाकिस्तानी कलाकाराचा व्हिडीओ व्हायरल


एकीकडे संपूर्ण भारत स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष  (75th year of Freedom) साजरे करत असताना, एका पाकिस्तानी कलाकाराकडून (Pakistani Musician Siyal Khan) आलेल्या शुभेच्छा सोशल मीडिया युजर्सच्या हृदयाला भिडल्या. पाकिस्तानी रबाब संगीतकार सियाल खान याचा भारतीय राष्ट्रगीत वाजवताना एक व्हिडिओ अलीकडेच ट्विटरवर अपलोड करण्यात आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


महत्वाच्या बातम्या : 


Viral Video: जेव्हा पाकिस्तानी कलाकाराने रबालवर वाजवले भारतीय राष्ट्रगीत 'जन गण मन'; अवघे जग झाले मंत्रमुग्ध!


PM Modi : वयाच्या शंभरीतही PM मोदींच्या मातोश्रींची देशभक्ती पाहून सारेच आश्चर्यचकित, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव


Police For Rent : पोलिसांसोबत संपूर्ण पोलीस स्टेशन देखील भाड्याने मिळेल, जाणून घ्या भारताच्या 'या' राज्यातील अनोखा कायदा


75th independence day : रस्त्यावरुन जात होती तिरंगा यात्रा, वृद्ध व्यक्तीने पाहताच केला सलाम, व्हिडीओ व्हायरल