Azadi Ka Amrit Mahotsav : 15 ऑगस्ट, 2022 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या खास वर्षी (Independence Day 2022) संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी केली जात आहे. भारत सरकार (Indian Government) हर घर तिरंगा सारखी अभियानं राबवत असून या अमृत महोत्सववर्षी विविध ठिकाणी रॅली आणि कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. अशाच एका तिरंगा रॅलीमधील (Tiranga Rally) खास व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.


सध्या सर्वत्र विविध रॅली आणि कार्यक्रमांचे आयोजन होत असताना या सर्वाचे व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. यादरम्यान एक असाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून प्रत्येत भारतीय भावूक होऊ शकतो. हा व्हिडीओ एका वृद्ध व्यक्तीचा असून यात तो व्यक्ती रस्त्यावरुन जाणाऱ्या तिरंगा रॅलीला कसा मनापासून सलाम करत आहे ते दिसून येत आहे.


काय आहे व्हिडीओ?


तर या व्हिडीओमध्ये एका ठिकाणी तिरंगा रॅली जाताना दिसत आहे. या व्हिडीओत एक वृद्ध व्यक्ती दिसत असून तो त्या रॅलीला पाहताच अगदी मनापासून सॅल्यूट अर्थात सलाम करताना दिसत आहे. संबधित वृद्ध व्यक्ती एक कष्टकरी व्यक्ती दिसत आहे. तो संबधित रॅलीत सामिल नसला तरी अगदी मनापासून तिरंगा पाहून सलाम करताना दिसत आहे. 


व्हायरल होत आहे VIDEO


केवळ एकदिवस किंवा हातात तिरंगा असताना तो फडकावणं म्हणजे देशभक्ती नाही, तर कायम तिरंग्याचा सन्मान करणं देशभक्ती आहे, असं या व्हिडीओतून दिसून येत आहे. तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) पक्षाचे नेते Y. S. Rajasekhara Reddy यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून कॅप्शमध्ये खरी देशभक्ती असंही लिहिलं आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी लाईक आणि त्यावर कमेंटही केली आहे. 


पाहा व्हिडीओ-






'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात


भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनूसार हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत असून राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 


हे देखील वाचा-