PM Modi : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या (75th Independence Day) रंगात रंगला आहे. वृद्ध असो वा तरुण, 75 वा स्वातंत्र्यदिन (Prime Minister's Mother) साजरा करण्याचा उत्साह देशातील प्रत्येकामध्ये पाहायला मिळत आहे. अशावेळी पंतप्रधानांच्या मातोश्रीही मागे नाहीत. त्यांच्या या देशभक्तीची सर्वत्र चर्चा होत आहे. 


पंतप्रधानांच्या मातोश्रींची 100 व्या वयातही देशभक्ती पाहून सारेच आश्चर्यचकित!


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीरा बा मोदी यांनी यावर्षी जूनमध्ये त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला. या वयातही त्यांनी स्वातंत्र्य उत्सव साजरा करताना दिसत आहे. ज्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. शनिवारी 13 ऑगस्ट रोजी त्यांनी गांधीनगर शहराच्या बाहेरील त्यांच्या निवासस्थानी मुलांना राष्ट्रध्वजाचे वाटप केले. त्या पंतप्रधानांच्या धाकट्या भावासोबत म्हणजेच त्यांचा धाकटा मुलगा पंकज मोदी यांच्यासोबत गुजरात (Gujarat) येथे राहतात. 15 ऑगस्टपूर्वी म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी त्यांनी त्यांच्या निवासस्थानी लहान मुलांना राष्ट्रध्वजाचे वाटप केले.


मुलांना राष्ट्रध्वजाचे वाटप



हर घर तिरंगा.. या मोहिमेचा एक भाग म्हणून हिराबा मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी मुलांना राष्ट्रध्वजाचे वाटप केले आणि त्यांच्यासोबत तिरंगा फडकवला. तत्पूर्वी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शनिवारी 13 ऑगस्ट रोजी राज्याची राजधानी गांधीनगर येथील चिल्ड्रन युनिव्हर्सिटीमध्ये 100 फूट उंच ध्वज फडकवला. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकारकडून तीन दिवसीय "हर घर तिरंगा" मोहिमेचा शुभारंभ केला.


'हर घर तिरंगा'..देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह


भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण (Independence Day) होत आहेत. यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. देशभरात 75 व्या स्वातंत्र्यदिनाची (Independence Day) तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. यंदा 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' (Azadi ka Amrit Mahotsav) मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून 'आजादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात


भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनूसार हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत असून राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.