अमृत महोत्साव : 'ऑलिम्पियाड बुध्दीबळ स्पर्धा' ज्योतच्या स्वागत सोळह्यानिमित्ताने 'टॉर्च रॅली'
बुध्दीबळ या खेळाचे उगम स्थान हे भारत असून बुध्दीबळ खेळाचा प्रसार व प्रचारासाठी ज्योत चे देशातील 75 ऐतिहासिक ठिकाणी बुध्दीबळचे आंतरराष्ट्रीय खेळाडू, ग्रँड मास्टर्सच्या हस्ते स्वागत करण्यात येणार आहे.
नागपूर : भारत प्रथमच आंतरराष्ट्रीय महासंघाद्वारे 44 वी ऑलिम्पियाड बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन 28 ते 10 ऑगस्ट या कालावधीत चेन्नई येथे करण्यात आले आहे. त्यानुषंगाने नागपूर जिल्ह्यात येणाऱ्या स्पर्धेच्या ज्योत (टार्च) चे अभूतपुर्व स्वागत सोळह्यानिमित्ताने टॉर्च रॅली 2 जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत जास्तीत जास्त खेळाडू, पुरस्कारार्थी व क्रीडा प्रेमींनी सहभाग घेऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, जिल्हा बुध्दीबळ असोसिएशन व नेहरु क्रीडा केंद्र यांनी केले आहे. बुध्दीबळ या खेळाचे उगम स्थान हे भारत असून बुध्दीबळ खेळाचा प्रसार व प्रचार देशभर व्हावा, यासाठी ज्योत चे (टार्च) देशातील 75 ऐतिहासिक ठिकाणी बुध्दीबळ खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू, ग्रँड मास्टर्स यांच्या हस्ते स्वागत करण्यात येणार आहे.
भारतात होणाऱ्या अदभूत बुध्दीबळ क्रीडा स्पर्धेच्या सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यात आगमन होणाऱ्या पवित्र ज्योत चे स्वागत करण्यासाठी तसेच या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी या कार्यक्रमास जिल्हा प्रशासन, बुध्दीबळ खेळाचे ग्रॅड मास्टर्स रौनक साधवाणी, दिव्या, देशमुख, संकल्प गुप्ता, विविध खेळाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू, क्रीडा क्षेत्रातील आंतरराष्टीय व राज्यस्तरावरील पुरस्कारार्थी, क्रीडा प्रेमी, राज्य बुध्दीबळ असोसिएशनचे पदाधिकारी, क्रीडा विभाग, इतर मान्यवरांच्या हस्ते बुध्दीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेची टॉर्च ही ग्रॅड मास्टर यांचे कडे हस्तांतरित करण्यात येईल. त्यानंतर ही ज्योत मास्टरच्या हातात घेऊन विमानतळाकडे मार्गस्थ होईल.
हा आहे 'टॉर्च' रॅलीचा मार्ग
2 जुलै रोजी सकाळी 6.40 वाजता बुध्दीबळ टॉर्च रॅली झिरो माईल येथून मार्गस्थ होईल. त्यानंतर संविधान चौक, आकाशवाणी चौक, महाराज बाग, लॉ कॉलेज, रवी नगर चौक, वाडी टी पाँईट, हिंगणा लिंक रोड या जी.एच रायसोनी इन्टिट्युट ऑफ इंजिनियरींग अँड टेक्नोलॉजी, श्रध्दा पार्क, एमआयडीसी पोलीस स्टेशन जवळ, हिंगणा वाडी लिंक रोड या मार्गे कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी पोहचेल. विमानतळाकडे जाण्याचा मार्ग जी.एच रायसोनी इन्टिट्युट ऑफ इंजिनियरींग अँड टेक्नोलॉजी, हिंगणा टि पाँईट वरुन छत्रपती स्क्वेअर मार्गे विमानतळ असा आहे.