Tiger Shroff Juhu Attack: 'हल्ल्यापूर्वी धमकी मिळाली होती का?'; टायगर श्रॉफने जबाबात काय काय सांगितलं? A to Z माहिती
Tiger Shroff Mumbai Juhu Attack: गोळीबार प्रकरणात अभिनेता टायगर श्रॉफचा मुंबई क्राइम ब्रँचकडून सविस्तर जबाब नोंदवला

Tiger Shroff Statemnet on Attack: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) फायरिंग केस प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 11 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. पोलिसांकडून (Tiger Shroff Police Investigation) या प्रकरणी कसून तपास सुरू आहे. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईतील जुहू परिसरात 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात, टायगर श्रॉफचा मुंबई क्राइम ब्रांचकडून (Crime branch) सविस्तर जबाब नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुहू परिसरात अभिनेत्यावर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर दुसर्याच दिवशी जबाब नोंदवला असल्याची माहिती आहे.
एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ हल्ला 19 ऑक्टोबर रोजी म्हणजेच हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी क्राइम ब्रांचने टायगर श्रॉफचा जबाब नोंदवल्याची सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास वर्दळीच्या ठिकाणी त्याच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी जबाब नोंदवला असल्याची माहिती समोर ली आहे. क्राइम ब्रांचची टीम अभिनेत्याची भेट घेण्यासाठी तेव्हा पोहोचले, जेव्हा टायगर श्रॉफ घरी नव्हता.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यावेळी टायगर श्रॉफ रुग्णालयात गेले होते. पुढील तपासणीसाठी टायगर श्रॉफला रुग्णालयात बोलवण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्राइम ब्रांचमधील अधिकाऱ्यांनी टायगर श्रॉफची महत्त्वाच्या पैलूंवर चौकशी केली. अभिनेत्याला, गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोरांकडून धमकी मिळाली होती का? असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा अभिनेत्याने यापूर्वी कोणतीही धमकी मिळाली नसल्याचं जबाबात सांगितलं, अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
टायगर श्रॉफवरील गोळीबारासाठी वापरलेली झिगाना पिस्तूल 2.5 लाखांची (Tiger Shroff Mumbai Juhu Attack Case New Update on Actors Statement)
मिळालेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफवर हल्ला करण्यासाठी वापरलेली झिगाना नावाची पिस्तूल अडीच लाख रुपयांची असल्याची माहिती समोर आली आहे. ही झिगाना पिस्तूल अमृतसर या ठिकाणाहून खरेदी केली असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. झिगाना पिस्तूल आणि 20 काडतुसे खरेदी करण्यासाठी 2.50 लाख रुपये दिल्याचे तपासात उघड झाले आहे. बिश्नोई गँगचा जवळचा व्यक्ती म्हणजेच अनिल पंडित याच्या निर्देशानुसार अमृतसरमधून शस्त्र आणि काडतुसे आणल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी कुणाल, सुमित आणि जतिन पैसे घेऊन थेट अमृतसरला पोहोचले होते. अमृतसरमधील एका अज्ञात ठिकाणाहून पिस्तूल आणि काडतुसे घेतल्याचा तपास यंत्रणेनं दावा केला आहे. ज्या ठिकाणाहून शस्त्र घेतले, त्याच ठिकाणी पैसे ठेवल्याची माहिती तपासातून उघड झाली आहे. अमृतसरमध्ये शस्त्र आणि काडतुसे पुरवणाऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, शस्त्र पुरवठादाराचा शोध लावण्यासाठी मुंबई क्राइम ब्रँचकडून अधिक तपास सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















