एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  ABP CVoter)
×
Top
Bottom

Uddhav Thackeray : 'त्या' शाखेत जाण्यापासून उद्धव ठाकरेंना रोखलं, अवघ्या 10 मीटर अंतरावरुन माघारी, मुंब्र्यात प्रचंड राडा, पुढची रणनीती काय?

Uddhav Thackeray Mumbra Shivsena Shakha Visit : उद्धव ठाकरे यांच्याशी पोलिसांनी संवाद साधला आणि शाखेपर्यंत न जाण्याचं आवाहन केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी न जाता मागे फिरण्याचा निर्णय घेतला. 

ठाणे: कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असं पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंब्र्यातील शाखेत न जाण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे हे शाखेच्या बॅरिकेट्सपर्यंत पर्यंत गेले आणि पोलिसांच्या आवाहनानंतर ते परत फिरले. त्यानंतर शिंदे गटाने विजयाचा दावा केला तर ही शाखा परत मिळवणारच असा निश्चय ठाकरे गटाने केला. 

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना शाखेपर्यंत न जाण्याचं आवाहन केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः बॅरिकेट्सपाशी पोहोचले. पोलिसांनी पुन्हा केलेल्या आवाहनांतर उद्धव ठाकरे पुन्हा गाडीत बसले आणि त्यांचा ताफा वळला. 

ही शाखा शिवसेनेची होती, ती ताब्यात घेतली आणि त्या ठिकाणी कंटेनर बसवण्यात आले हे कोणत्या कायद्यात बसतं असा सवाल शिवसेना नेते अनिल देसाई यांनी केला. तर ही शाखा आमचीच आहे, ती आम्ही मिळवणारच असा निश्चय विनायक राऊत यांनी केला. 

उद्धव ठाकरे मुंब्र्याच्या शाखेला भेट देण्यास निघाल्यानंतर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. ठाण्यातील आनंदनगर टोल नाक्यावर कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला आणि त्यानंतर बाईकने त्यांच्याोसोबत मुंब्र्याकडे रवाना झाले. त्यानंतर मुंब्र्यामध्ये पोहोचल्यावर त्यांचा ताफा अडवण्यात आल्याची तक्रार ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं.

शाखेपर्यंत जाऊ नये; पोलिसांचे उद्धव ठाकरेंना आवाहन

उद्धव ठाकरे मुंब्र्यामध्ये पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधला. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती  लक्षात घेता उद्धव ठाकरेंनी शाखेपर्यंत जाऊ नये असं आवाहन पोलिसांनी ठाकरेंना केलं. त्यामुळे त्या ठिकाणी बराच वेळ गोंधळ सुरू होता. त्यावेळी उद्धव ठाकरे हे 10 ते 15 मीटरच्या अंतरावर होते. 

मुंब्र्यातील शाखेचा नेमका वाद काय? 

मुंब्रा इथं शिवसेनेची शाखा होती. राज्यातील सत्तांतर आणि शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन गटात शिवसेना विभागली. त्यानंतर शाखा-शाखांवर दोन्ही गटांकडून दावा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंब्र्यातील शाखेवर दोन्ही गटांनी दावा केला. 2 नोव्हेंबरला मुंब्य्रातील ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाने ताबा मिळवत बुलडोझर फिरवल्याचा आरोप आहे. 

आधीची शाखा जमीनदोस्त केल्यानंतर शिंदे गटाने त्याच ठिकाणी कंटेनर शाखा बसवली आहे. ही शाखा तात्पुरती असल्याचे सांगण्यात आले. मुंब्र्यातील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढत शिंदे गटाने ही शाखा जेसीबीने जमीनदोस्त केल्याने गोंधळ उडाला होता. 

मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक असणारे राजन किणे (Rajan Kine) यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 50 जणांच्या जमावाने शाखेत घुसून शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखाला बाहेर काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर शाखेवरील बोर्डही काढला आणि शिंदे गटाचा बोर्ड लावून शाखेत प्रवेश मिळवत कब्जा केल्याचा आरोप आहे.  

ही बातमी वाचा : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
Pune Porsche Car Accident : शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
BLOG : काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
Shah Rukh Khan : शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bajrang Sonawane Beed Exit Poll : जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा झाला,बीडमधून मी 100% निवडून येणारRaksha Khadse Raver Lok Sabha Exit Poll : रावेर लोकसभेत एक ते दीड लाख मतांचा लीड मिळणारArunachal Pradesh : अरुणाचल प्रदशेमध्ये भाजपचा दणदणीत विजय, 42 जागांवर मारली बाजीABP Majha Headlines : 01 PM : 02 June  2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
Pune Porsche Car Accident : शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
BLOG : काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
Shah Rukh Khan : शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
Raveena Tandon : कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
Mumbai Crime News : मुंबई एअरपोर्टवरील अधिकारी चक्रावले; प्रवाशाच्या गुदद्वारातून बाहेर काढलं लाखोंचं सोनं, पाहा फोटो
प्रवाशाने 'अवघड' जागी सोनं लपवलं, पण कस्टमच्या अधिकाऱ्यांनी हुडकून काढलंच, मुंबई एअरपोर्टवर गुदद्वारातून सोन्याची तस्करी
Exit Poll 2024: चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
Deepak Kesarkar: उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी मेसेज पाठवतायत, त्यांना एनडीएमध्ये यायचंय; दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे मोदींना भेटण्यासाठी मेसेज पाठवतायत, त्यांना एनडीएमध्ये यायचंय; दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा
Embed widget