एक्स्प्लोर

Dahi handi 2022 : गो…गो…गोविंदा! ठाण्यात दहीहंडीची जय्यत तयारी, कलाकारही राहणार उपस्थित

Thane , Dahi handi 2022 : दहीहंडी उत्सवात कोणत्या आयोजकाकडे कोणते सेलिब्रिटीज बघायला मिळतील हे बघण्यासाठी गर्दी असते.

Dahi handi 2022 : दहीहंडी उत्सवात ज्याप्रकारे गोविंदा पथकांनी लावलेले मानवी मनोरे बघण्यासाठी लाखोंची गर्दी उसळते, त्याचप्रमाणे या दहीहंडी उत्सवात कोणत्या आयोजकाकडे कोणते सेलिब्रिटीज बघायला मिळतील हे बघण्यासाठी देखील तितकीच गर्दी असते. त्यासाठी आधीपासूनच प्रमोशन देखीलल सुरू करण्यात येते. ठाण्यात यावर्षीच्या दहीहंडीमध्ये कोणत्या आयोजकांनी कोणते सेलिब्रिटी बोलवले आहेत, ते पाहूयात...  

ज्या सिनेतारकांना टीव्हीवर किंवा मोबाईलवर पाहिलेले असते, त्यांना प्रत्यक्षात बघण्याची नामी संधी दहीहंडी उत्सवात चालून येते. आणि अशी संधी सहसा कोणी सोडत नाही. गेली दोन वर्ष कोरोनामुळे दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर निर्बंध असल्याने गोविंदांना आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील अशी संधी उपलब्ध झाल्या नव्हती. यावर्षी मात्र निर्बंध मुक्त असा दहीकाला उत्सव साजरा करण्यात येतोय. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील आयोजक देखील प्रचंड उत्साहात हा उत्सव साजरा करणार आहेत. त्यासाठी प्रसिद्ध असे सेलिब्रिटीज आपल्याच स्टेजवर असावे यासाठी देखील अनेकांची धडपड सुरू आहे. ठाणे शहरात मोठ्या आयोजकांपैकी एक असलेल्या प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावर दाक्षिणात्य स्टार डियर कोम्रेड फेम विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे येणार असल्याचे कळते आहे. यासोबतच अनेक ठिकाणी बॉईज 3 ची पूर्ण टीम, अवधूत गुप्ते दगडी चाळ 2 ची टीम, अंकुश चौधरी पूजा सावंत, अमेरिका गॉट टॅलेंट मधून प्रसिद्ध X1X ग्रुप परफॉर्मन्स, असे सेलिब्रिटी बघायला मिळतील.

धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. या तिन्ही नाक्यावर उद्या... यामी गौतम, तमन्ना भाटिया, श्रद्धा कपूर आणि जॅकी श्रॉफ या बॉलीवूड कलाकारांच्या सोबत भार्गवी चिरमुले, अवधूत गुप्ते, हार्दिक जोशी, स्मिता सरोदे, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, पूर्णिमा तळवलकर, चेतन वर्दने, बॉईज 3 ची टीम, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, विदुला चौघुले असे मराठी कलाकार बघायला मिळतील.  

दुसरीकडे स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला हार्दिक जोशी, अक्षाया देवधर, बॉईज 3 ची टीम, अनु मलिक, शशांक कल्याणकर आणि चला हवा येऊ द्या टीम, हास्य जत्रा टीम आणि शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर देखील उपस्थित असतील.

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Alert : मुंबईसह उपनगरात मुसळधार, कोकणात सर्वदूर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी, राज्यातील 23 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईसह उपनगरात मुसळधार, कोकणात सर्वदूर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी, राज्यातील 23 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?
Thane : ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत महायुतीची बाजी; एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाण यांच्या रणनीतीला यश
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत महायुतीची बाजी; एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाण यांच्या रणनीतीला यश
Ulhasnagar Hospital : मोफत उपचारांच्या नावाखाली गर्भवतीच्या जीवाशी खेळ? उल्हासनगर शासकीय प्रसूतीगृहाच्या चौकशी अहवालात मोठा निष्काळजीपणा उघड
मोफत उपचारांच्या नावाखाली गर्भवतीच्या जीवाशी खेळ? उल्हासनगर शासकीय प्रसूतीगृहाच्या चौकशी अहवालात मोठा निष्काळजीपणा उघड
टेंडरविनाच लाखोंचं भंगार खासगी कंपनीच्या घशात, KDMC चा प्रताप, 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर अधिकाऱ्यांची सारवासारव
टेंडरविनाच लाखोंचं भंगार खासगी कंपनीच्या घशात, KDMC चा प्रताप, 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर अधिकाऱ्यांची सारवासारव

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Lohgarh Fort: केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
Eknath Shinde on Uddhav Thackeray: आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा 'दे धक्का', म्हणाले काही...
रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा 'दे धक्का', म्हणाले काही...
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Embed widget