Shahapur News: फोटो काढण्याच्या मोहाने घात केला; शहापुरात नदीत बुडून युवकाचा मृत्यू
Thane Shahapur News: नदी पात्रात फोटो काढण्याच्या मोहाने एका तरुणाचा घात केला. या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.
Thane Shahapur News: नदीपात्रात फोटो काढण्याच्या मोहाने एका तरुणाचा घात केला. नदीपात्रात फोटो काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू झाला आहे. करण अशोक फर्डे असे या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे. करण आपल्या मित्रांसह आंघोळीसाठी नदीवर गेला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शहापूर तालुक्यातील (Shahapur) शिवनेर (Shivner) या गावातील काही युवक आंघोळी साठी नदीवर गेले. पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले मात्र मोबाईल कॅमेरात (Mobile Camera) फोटो काढण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्याने करणचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
करण आपल्या मित्रांसोबत गावाजवळ असलेल्या नदीपात्रात पोहण्यासाठी गेले. परंतु करणने फोटो काढण्याच्या नादात नदीच्या खोल भागात गेला. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने करण फर्डे बुडू लागला. त्याने वाचवण्यासाठी मित्रांना हाक दिली तेव्हा त्याला वाचविण्यासाठी त्याच्या मित्रांनी प्रयत्न केला. परंतु, ते अपयशी ठरले. त्यानंतर गावकऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नदीपात्रात करण फर्डेचा शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह नदी पात्रात मिळून आल्याने पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनाकरिता शहापूर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह पाठवला असून रुग्णालयात नातेवाईक तसेच गावकऱ्यांनी गर्दी केली होती.
धक्कादायक! वडिलांनी मोबाईल वापरण्यावरून हटकलं, अल्पवयीन मुलानं उचललं टोकाचे पाऊल
परीक्षेचे दिवस असल्यानं वडिलांनी नवव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला मोबाईल (Mobile) बाजूला ठेवून अभ्यास कर, असं म्हंटलं. वडिलांनी मोबाईल खेळण्याला विरोध केल्याचा राग मनात ठेवून मुलानं टोकाचं पाऊल उचलत शाळेच्या टायने गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केली. ही हृदयद्रावक घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील चन्ना (धानला) गावात घडली. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हिमांशु गुणेश राघोर्ते असं टायने गळफास घेवून आत्महत्या करणाऱ्या नववीच्या विद्यार्थ्याचं नाव असून तो 15 वर्षांचा होता. हिमांशु हा लाखनी येथील समर्थ विद्यालयात इयत्ता नवव्या वर्गात शिक्षण घेत असून सध्या परीक्षेचे दिवस तोंडावर आहे. वडील गुणेश यांनी मुलगा अभ्यास न करता मोबाईलवर खेळत असल्याचं दिसून आलं. त्यांनी मुलाला मोबाईल ठेवून अभ्यास करण्याबाबत हटकले. वडिलांनी हटकल्यानं मुलगा हिमांशु याने हा राग मनावर घेतला आणि टोकाचं पाऊल उचलत घरातील छताच्या लोखंडी कडीला शाळेच्या स्वतःच्या टायने गळफास घेतला.