एक्स्प्लोर

कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं; नियोजनाच्या अभावामुळे गाड्या 6 तास उशीरानं, ढिसाळ कारभाराचा चाकरमान्यांना फटका

Konkan News: कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं असून रेल्वेप्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे गाड्या 6 तास उशीरानं धावत आहेत.

Maharashtra Konkan News: गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) कोकणवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, त्यामुळे काही महिन्यांपूर्वीपासूनच कोकणवासीय (Konkan News) रेल्वेचं तिकीट आरक्षित करत असतात. मात्र रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारामुळे कोकणवासीयांना रेल्वेस्थानकांवर 5 ते 6 तास ताटकळत थांबावं लागत आहे. कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या 6 तास उशिरानं धावत असल्यामुळे कोकणवासीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 12 तासांच्या प्रवासासाठी कोकणाची वाट धरलेल्या चाकरमान्यांना तब्बल 18 तास लागत असल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

कोकण रेल्वेच्या डाऊन मार्गावर गाड्यांचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच गाड्या तीन ते चार तास उशिरानं धावत आहेत. त्यामुळे नियमित गाड्यांनाही फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचाच परिणाम काही रेल्वे गाड्यांवरही झाला आहे. आज सकाळी सीएसएमटीहुन मडगावला जाणारी मांडवी एक्सप्रेस सुटलीच नाही. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेनं जाणाऱ्या चाकरमान्यांच्या नशिबी प्लॅटफॉर्मवर तिष्ठत राहण्याची वेळ आल्याचं पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ : Ganeshotsav 2023: गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची ठाणे स्थानकात गर्दी

ठाण्यात कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची झुंबड 

सध्या गणेशोत्सवाची लगबग जोरदार सुरू आहे. प्रत्येकामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं कोकणवासी आपल्या गावी जात असतात. तसेच गावी जाण्यासाठी फलाटावर मोठी गर्दीही होत असल्याचं पाहायला मिळालं. रेल्वेनं गावी जाण्यासाठी मुंबई, ठाण्यातील चाकरमानी प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडाल्याचं चित्रं पहायला मिळालं. या गर्दीमुळे काही प्रवाशांची ट्रेनही मिस झाली. त्यामुळे प्रवाशांची मोठ्याप्रमाणात गैरसोय झाली होती. यंदा कोकणात 200 हून अधिक रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. दरम्यान आजही दिवा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची झुंबड उडाली होती. तसेच आपला जीव धोक्यात घालून प्रवासी रेल्वेतून प्रवास करत असल्याचं चित्रही यावेळी पहायला मिळालं.

"कोकण रेल्वेच्या नियोजनाच्या अभावामुळे सर्व ट्रेन 5 ते 6 तास उशिरानं धावत आहेत. मागणी करूनही सर्व सुपरफास्ट एक्सप्रेस मिरज मार्गे न वळवल्यानं आणि मालगाड्या सुरू ठेवल्यानं, चाकरमन्यांना तब्बल 18 तासांचा प्रवास करावा लागत आहे, लोक सावंतवाडीपर्यंत पोहोचणार केव्हा? म्हणजे चाकरमन्यांनी तीनशे रुपयांचं तिकीट काढून मुंबईतून यायचे आणि स्टेशनला उतरल्यावर एक हजार रुपयांची रिक्षा करून घरी जायचं का?", असा सवाल प्रवाशी संघटनांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, कोकण रेल्वेच्या प्रशासनानं रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याचं सर्व खापर हे मेगाब्लॉकवर फोडलं आहे. सदर विलंब ब्लॉकमुळे असून त्याबद्दल आधी माहिती जाहीर केली असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
Shivdeep Lande: आई ती आईच... शिवदीप लांडेंच्या मातोश्री म्हणाल्या पोरानं IPS नोकरी राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे
Shivdeep Lande: आई ती आईच... शिवदीप लांडेंच्या मातोश्री म्हणाल्या पोरानं IPS नोकरी राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
Shivdeep Lande: आई ती आईच... शिवदीप लांडेंच्या मातोश्री म्हणाल्या पोरानं IPS नोकरी राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे
Shivdeep Lande: आई ती आईच... शिवदीप लांडेंच्या मातोश्री म्हणाल्या पोरानं IPS नोकरी राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Bihar Election Result 2025: बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
Embed widget