एक्स्प्लोर

Ramesh Mhatre Dombivli Case: "पोत्यांनी पैसा देऊन वकील लावले तरी 'त्या' देवाच्या न्यायालयात तुझी सुटका नाही"; रमेश म्हात्रेंच्या हल्ल्यानंतर डॉक्टरांच्या आईची काळजाला भिडणारी पोस्ट

Ramesh Mhatre Dombivli Case: माझ्या डॉक्टर बाळावर मस्तीने माजलेल्या एकाच वेळी चौघांनी फक्त बेदम मारहाणच केली नाही, तर एका सिंगल आईच्या काळजाला हात घातला, असेही त्यांनी म्हटले आहे.

Ramesh Mhatre Dombivli Case: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एका नवजात बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिल्याचा रागातून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती. शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिला डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाणीप्रकरणी पोलिसांनी नगरसेवकासह चौघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

या संपूर्ण घटनेच्या भीषणतेवर आणि एका डॉक्टरच्या वेदनेवर प्रकाश टाकणारी एक अत्यंत भावुक आणि तितकीच संतापजनक पोस्ट पीडित डॉक्टरच्या आईने लिहिली आहे. एका एकल माता म्हणून त्यांनी आयुष्यभर संघर्ष करून आपल्या मुलाला डॉक्टर बनवले, पण सत्तेच्या माजातून त्याला कशी अमानुष मारहाण झाली, याचे काळीज पिळवटून टाकणारे वर्णन त्यांनी या पोस्टमध्ये केले आहे.

Ramesh Mhatre Dombivli Case: डॉक्टरांच्या आईची पोस्ट 

"कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये अमानुषपणे मारहाण केलेल्या घटनेचा जाहीर निषेध... देवदूत म्हणून रुग्णांची सेवा करणाऱ्या माझ्या डॉक्टर बाळावर मस्तीने माजलेल्या एकाच वेळी चौघांनी फक्त बेदम मारहाणच केली नाही, तर एका सिंगल आईच्या काळजाला हात घातला.

काय यातना झाल्या असतील एका आईला, जिने आपल्या बाळाला एकाच वेळी चार-चार जण बेदमपणे, अमानुषपणे मारहाण करीत असतानाचा व्हिडिओ पाहिला तेव्हा? कोणी कल्पना पण करू शकणार नाही. काळीज पिळवटून टाकणारे दृश्य पाहून डॉक्टरच्या आईने हंबरडाच फोडला."

Ramesh Mhatre Dombivli Case: वडिलांचे छत्र हरवले, आयुष्यभर संघर्ष करून पोटचा गोळा वाढवला

"ज्या आईने वडिलांचे छत्र केवळ अडीच वर्षाचे बाळ असताना हरवले, त्याच आईने काळजावर मोठा दगड ठेवून, आयुष्यभर संघर्ष करून पोटचा गोळा वाढवला, जपला, रुग्णांची सेवा आपला मुलगा करावा म्हणून मुलाला स्वतःच्या हिंमतीवर एकटीने शिकवले; त्याच अत्यंत गुणी, हुशार, मनमिळावू माझ्या डॉक्टर बाळाला मी स्वतः कधीच पाच बोटांनी पण शिवले नाही. त्या बाळाला सत्तेची माज असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी गुंडांची टोळी सोबत नेऊन मारून काढले.

माझा मुलगा आठ दिवस झाले कॉटच्या खाली पण उतरत नाही, केवढा मानसिक धक्का (Mental Shock) बसलेला आहे. व्हिडिओ बघणाऱ्याच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाही. मी त्याची आई म्हणून मला तर त्या घाणेरड्या शिव्या ऐकवल्याच नाहीत. कोणी ऐकू पण शकणार नाही, इतक्या अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्याच्या शिव्यांवरून त्या माणसाची माणुसकी आणि लायकी कळते. त्याच्यावर कसले संस्कार झाले असतील हे सांगायलाच नको."

Ramesh Mhatre Dombivli Case: हल्लेखोरावर ऑलरेडी 17 गुन्हे दाखल

"पण म्हणतात ना जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार वाढतो, तेव्हा तेव्हा कोणाला तरी एका अवतारात जन्म घ्यावा लागतो. दुष्ट कंसाने खूप अन्याय केला म्हणून श्रीकृष्णाला जन्म घ्यावा लागला, रावणाचा घमंड तोडण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्राला जन्म घ्यावा लागला, हिरण्यकश्यपूचा हाहाकार माजला होता म्हणून भक्त प्रल्हादाला जन्म घ्यावा लागला, इंग्रजांना पळवून लावण्यासाठी क्रांतिकारकांना फासावर जावे लागले; अगदी त्याचप्रमाणे केडीएमसी डोंबिवलीच्या हॉस्पिटलमध्ये मस्तीने माजलेल्या गुंडावर ऑलरेडी 17 गुन्हे दाखल असताना, घमंड तोडण्यासाठी माझ्या डॉक्टर बाळाला हल्लेखोरांच्या तावडीत सापडावे लागले.

मी त्याची आई म्हणून माझ्या जीवाची किती घालमेल झाली असेल याचा अंदाज जगातला कोणीच लावू शकणार नाही. आईचे काळीज धाय मोकलून रडले. माझ्या आतड्यांची आठ दिवस झाले अजून आग होतेय. बीपी लो चा पहिलेच त्रास, पण जी एकल विधवा महिला आपल्या लेकरांवर अख्खे आयुष्य काढते, तिचा श्राप त्या चार नालायक लोकांना लागल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणतात प्रत्येकाचे दिवस भरले की त्याला असे कर्म सुचतात."

Ramesh Mhatre Dombivli Case: 4 गाड्या भरून गुंडांची टोळी; असे केले पूर्व प्लॅनिंग

"पेशंटच्या आईने कितीही डोकं भडकावून दिले (त्या बाईला पण सहआरोपी करा), तरी ॲक्चुअली तिथे काय परिस्थिती आहे हे नगरसेवक या नात्याने समजून घ्यायला हवे होते. बरं, एकट्याने मारून कुठे गप्प बसला? जाणीवपूर्वक चार गाड्या गुंडांची टोळीच घेऊन टोळीचा म्होरक्या समोर जाऊन काही गुंड मेन गेटवर, काही पोर्चमध्ये, काही मेन डिलिव्हरी वॉर्डच्या बाहेर, काही आत कॅबिनमध्ये... इतके पूर्व प्लॅनिंग करून एखाद्याच्या लेकराला इतके बेदमपणे मारहाण कोणी करते का?"

Ramesh Mhatre Dombivli Case: माझ्या बाळावर तब्बल 31 वार; संभाजी महाराजांची आठवण झाली!

"म्हात्रेचे 7 वार, तीन किलोच्या रजिस्टरने डोक्यात मारलेली सूज आठ दिवस झाले अजून गेली नाही; त्याच्या बॉडीगार्डने अवघड जागी घातलेली लात व दोन वार, दुसऱ्या गुंडाने केलेले 8 वार आणि पांढरा टी-शर्ट घालून फुकटच्या तुकड्यावर जगलेल्या, मस्तीने माजलेल्या माणसाचे 12 वार... असे एकूण 31 वार माझ्या बाळावर केलेत. तेव्हा मला छत्रपती संभाजी महाराजांची आठवण झाली आणि हे दरिंदे औरंगजेबाच्या पाळलेल्या कुत्र्यासारखे वाटले.

एका लेडीज डॉक्टरला, जी त्याच्या नातीसारखी आहे, तिच्यावर हात उगारताना कसला आलाय पुरुषार्थ? डॉ. सृष्टीच्या कानफटात जोरात लगावल्याने माझा मुलगा पुढे झाला आणि या अंदाजाचा/सगळ्या घटनेचा काहीच कारण नसताना बळी (Victim) ठरला. एखाद्या लेडीजवर अन्याय होताना पाहू शकत नाही, हेच आमचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्याच्या नसात मी पेरले आहेत."

Ramesh Mhatre Dombivli Case: एनआयसीयू बेड अवेलेबल नसताना डॉक्टर काय करणार?

"एनआयसीयू बेड अवेलेबल नसताना डॉक्टर लोक काय करणार? परिस्थिती काय आहे याचा विचार न करताच गुंडांना घेऊन जाऊन मारहाणी करणे अत्यंत चुकीचे आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना समाजाने वेळीच ओळखले पाहिजे, नाहीतर दररोज अशा कितीही घटना घडतील.

माननीय कोर्टाला नम्र विनंती आहे की मग्रूर अशा म्हात्रे व त्याच्या गुंडांनी माझ्या डॉक्टर बाळाला व डॉक्टर सृष्टी, तसेच तिथल्या स्टाफ नर्स, मावशी ज्यांच्या ज्यांच्यावर हात उचलला, त्यांच्यासमोर लोटांगण घालून दोन्ही हात जोडून मीडियासमोर माफी मागावी... तरीही शिक्षा झालीच पाहिजे... यापुढे तरी अशी मगरुरी अंगात येताना शंभर वेळा विचार करेल. लोक साधे कुत्र्याला दगड मारू देत नाहीत आणि हा माजलेला, आपल्याच मस्तीत धुंद असलेल्या 73 वर्षाच्या गुंडाने 27 वर्षाच्या डॉक्टरवर हात उचलला. माझ्या बाळावर हात उगारून एका आईच्या काळजाला हात घातला आहे... याची सजा आदरणीय कोर्टाकडून मिळावी हीच अपेक्षा..."

Ramesh Mhatre Dombivli Case: 'त्या' वरच्या न्यायालयात सुटका नाही!

"लोक बोलतात तो नगरसेवक व्यक्ती पैशाने जजला पण विकत घेतो... हा शब्द आपण योग्य निर्णय घेऊन खोडून टाका... कठोरातली कठोर कारवाई करावी ही विनंती... आणि असे जर झाले नाही तर यावरती एक न्यायालय आहे, तिथे मात्र एकेका क्षणाचा हिशेब चुकता करावा लागेल. तुमच्या कर्माची फळे तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत.

माझा मुलगा फार मोठ्या मानसिक धक्कातून जात आहे. झोपेत पण डोक्यावर हात वर करतो बचावासाठी... त्याच्या जीवाला धोका आहे, माझ्यासुद्धा... म्हणून हे निनावी लिहीत आहे... यानंतर जर आम्हाला काही झाले, त्याला जबाबदार गुंड नगरसेवक असणार आहे. खरे तर आम्हाला पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे. खरे तर पोलीस प्रोटेक्शन ज्या हॉस्पिटलमध्ये असायला हवे, तिथे जर असते तर हे सगळे घडलेच नसते. सर्वात मोठे नवल म्हणजे नगरसेवकासोबत जो पोलीस गार्ड होता, त्याने मारायची काय गरज? कायदा हातात घेताना या लोकांना लाजा कशा वाटत नाहीत? की कायदा नावाची गोष्टच राहिली नाही असेच वाटत आहे."

Ramesh Mhatre Dombivli Case: आपल्या मुलाला डॉक्टर बनवावे की नाही?

"माननीय न्यायालयाच्या समोर त्याचे वकील पोत्याने पैसा देऊन लावलेले, बनवाबनवी करून कितीही सांगतील; पण मला वाटते एकदा ऑडिओ क्लिपमधील अर्वाच्य भाषेत केलेली शिवीगाळ, केलेला भयानक प्रकार सर्व सीसीटीव्हीमध्ये साफ दिसत आहे. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना दुसऱ्यांना मारण्याचे सर्टिफिकेट कोणी दिले याचीही चौकशी व्हावी. आम्हाला झालेला शारीरिक, मानसिक त्रास आम्ही कसे सहन करतोय ते आमचे आम्हाला माहीत. आम्हाला तुमच्या राजकारणाशी काही देणेघेणे नाही. आम्ही गरीब सामान्य माणसे. यापुढे प्रत्येकाला पडलेला प्रश्न आपल्या मुलाला डॉक्टर बनवावे की नाही...

याची एकच दिवस छाती दुखली की शेवटी डॉक्टर लोकांकडेच जावे लागले, दवाखान्यात व्हीआयपी ट्रीटमेंट घेत बसला. याची अक्कल तरी आली तर बरे होईल... स्वतःला वाचविण्यासाठी खोटे व्हिडिओ बनवत आहे. हॉस्पिटलमध्ये योग्य ट्रीटमेंट करीत नाहीत म्हणून काही पेशंट पैसे खाऊ घालून पाठवत आहे. हॉस्पिटलची बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय. न्यायालय जो निकाल देईल तो देईल, भलेही तू पैशाच्या जोरावर सुटशील; पण वरती एक न्यायालय आहे, तिथे मात्र तुझी सुटका नाही हे लक्षात ठेव. क्योंकि भगवान के घर देर है पर अंधेर नहीं.

- "कसलीही चूक नसताना चार गुंडांचा वार सहन करणाऱ्या डॉक्टर बाळाची आई..."

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Dombivli:'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Siddhivinayak Mandir : मोठी बातमी! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणी एकनाथ शिंदेंकडून सखोल चौकशीचे आदेश; दोषी आढळ्यास कारवाईचा बडगा!
मोठी बातमी! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणी एकनाथ शिंदेंकडून सखोल चौकशीचे आदेश; दोषी आढळ्यास कारवाईचा बडगा!
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Thane : तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? पोलिसांचा मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांना प्रश्न; मनसेचे अविनाश जाधव संतापले
तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? पोलिसांचा मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांना प्रश्न; मनसेचे अविनाश जाधव संतापले
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
Embed widget