सत्तेत असताना भारत जोडो यात्रा करावी वाटली नाही का?, नारायण राणे यांची राहुल गांधींवर टीका
Narayan Rane: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीकास्त्र सोडलेय.
Narayan Rane: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीकास्त्र सोडलेय. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्य सावरकर यांच्याबद्दल केलेला वक्तव्याबाबत नारायण राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलेय. राणे म्हणाले की, राहुल गांधींच्या वक्तव्याचा भाजपने निषेध केला आहे. इतके वर्ष देशात सत्तेत होते, आता त्यांना भारत जोडो यात्रा करावी वाटली. भारत जोडो यात्रेत तेच ते लोक दिसत आहेत. महाराष्ट्रात नवीन लोक काही सामील होत नाहीत. शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस हे सगळे पक्ष भारत जोडो आहेत. अजून या तीन पक्षाचे मन जुळले नाही, ते जोडलेले नाहीत.. सत्तेसाठी फक्त एकत्र येतात हे चित्र आहे. यामध्ये त्यांना काही यश मिळणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे आज डोंबिवलीत एका खाजगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले होते, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आदित्य ठाकरेंवर टीका -
नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली..आदित्य ठाकरेवर मी कधी काही बोलत नाही, ते बालिश आहेत. ते कधी कोणाला भेटायला जाईल ...सावरकरांचा देशासाठी योगदान काय आहे ...बाळासाहेब ठाकरे हे सावरकरांना का मानत होते.. याचा त्यांना गंध नाही, ना त्यांच्या वडिलांना उद्धव ठाकरे यांना त्याचा गंध आहे.. आदित्य ठाकरे फोटोमध्ये येतील म्हणून गेले असतील. सावरकरांबद्दल बोलल्याची चीड त्यांना नाही असे नारायण राणे म्हणाले.
त्या शिवसेना सोडून चालल्या होत्या. मी थांबवलं - नारायण राणे
शिवसेनेवर टीका केल्याशिवाय नारायण राणे यांना प्रमोशन मिळत नाही अशी टीका शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली होती यावर बोलताना नारायण राणे यांनी माझ्या शिफारसी शिवाय ताई शिवसेनेत राहिल्या नसत्या. त्या शिवसेना सोडून चालल्या होत्या. मी त्यांना थांबवलं. त्यांना आठवतं का विचारा? असा गौपयस्फोट नारायण राणेंनी केला. पुढे बोलताना ताई नाराज आहेत, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना मंत्रीपद मिळालं नाही. असे राणे म्हणाले.
सुप्रिया सुळेंवर काय म्हणाले?
खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्या बदल्याचे राजकारण सुरू असल्याचे टीका केली होती, यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, पहिले बदले घेतले जायचे पण दाखवले आणि सांगितले जायचे नाहीत. गपचूप बदले घ्यायचे. नाव पाहिजे तर त्यांना सांगा मी जाहीर करतो, असे किती बळी गेलेत अगदी दुखारीपासून ते आत्तापर्यंत अशी टीका केली.