एक्स्प्लोर

Madhav Bhandari : ब्राह्मण समाजाला आरक्षणाची गरज नाही, जिथे जाऊ तिथे आपलं स्थान निर्माण करू : माधव भंडारी

Kalyan Brahman Sabha Programme : राजकारणामध्ये संख्या पाहिली जाते. त्यामुळे आपल्या समाजाचा टक्का वाढवला पाहिजे असं आवाहन भाजपचे नेते माधव भंडारी यांनी केलं. 

ठाणे : ब्राह्मण समाजाने कोणताही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत ब्राह्मण समाजाचा वाटा दुर्लक्ष करण्यासारखं नाही. देशातील उद्योगांच्या उभारणीत ब्राह्मण समाजाचे योगदान खूप मोठं आहे. देशात समाज सुधारण्यासाठीच्या चळवळी झाल्या त्या उभ्या करणारे बहुतेक ब्राह्मण होते. त्यामुळे आपल्याला आरक्षणाची गरज नाही. आम्ही जिथे जाऊ तिथे आमचे स्थान निर्माण करू असे भाजप नेते माधव भंडारी यांनी म्हटलं. कल्याण ब्राह्मण सभेतर्फे अत्रे नाट्यगृहात राज्यभरात निवडून आलेल्या ब्राह्मण आमदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात भंडारी बोलत होते.

महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य सत्कार सोहळा कल्याणमध्ये आयोजित करण्यात आला होता. कल्याण ब्राह्मण सभेतर्फे कल्याणच्या आचार्य अत्रे सभागृहात या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार किरण सामंत, संजय केळकर, भाजप नेते माधव भंडारी, सांगलीचे आमदार  सुधीर गाडगीळ, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले, बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

आपला टक्का वाढवला पाहिजे

यावेळी बोलताना भाजप नेते माधव भंडारी म्हणाले की, "राजकारणामध्ये संख्येचा आणि पैशांचा टक्का बघितला जातो. जोपर्यंत आपला टक्का वाढवत नाही, आपली रेष वाढत नाही तोपर्यंत आपल्याला अपेक्षित असलेले यश मिळणार नाही. आपण आता साडेदहा-अकरा टक्क्यांच्या घरात आहोत आणि हा काही लहान आकडा नाही. गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीने आपल्या समाजाचा अपमान करण्याची मोहीम एका विशिष्ट वर्गाकडून सुरू आहे ते पाहिल्यानंतर आता गप्प राहून चालणार नाही असं वाटायला लागलंय."

ब्राह्मण म्हणून न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही

माधव भंडारी पुढे म्हणाले की, "पूर्वीचा इतिहास काय होता त्या चर्चेला काही अर्थ नाही. हे फक्त आपल्याबद्दलच नाही. मात्र समाजातील कोणत्याही घटकाला जर असा अपमान, वागणं सहन करावं लागत असेल तर योग्य नाही. आपण ब्राह्मण म्हणून कोणताही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. खेड्यापाड्यात राहणाऱ्या एकट्या ब्राह्मणाला संरक्षणाची गरज आहे. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी आपले वजन वापरण्याची गरज आहे."

परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी 200 कोटी मागितले पाहिजे अशी मागणी भंडारी यांनी यावेळी महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांच्याकडे केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 05 January 2025Suresh Dhas on Santosh Deshmukh | संतोष देशमुखांच्या हत्येचा कट मे महिन्यात शिजला, सुरेश धसांचा दावाBangladeshi Rate Card | बांगलादेशींना भारतात येण्यासाठी दलालांना द्यावे लागतात 7-8 हजार रूपयेABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 05 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
China World Largest Dam On Brahmaputra River : ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
Embed widget