एक्स्प्लोर

रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत

कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि दोन मधील ओव्हरहेड वायरच्या खांबावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारासएक अज्ञात व्यक्ती चढला.

ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकात एक अज्ञात व्यक्ती ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढला होता. त्यामुळे, रेल्वे स्थानक परिसरात गोंधळ उडाला, तो जवळपास दोन तास त्या खांबावरच इकडून तिकडे करत होता. या दरम्यान कल्याण रेल्वे स्थानकाच्या एक आणि दोन फलाटावर रेल्वेसेवा (Railway) विसकळीत झाली होती. अखेर कंरट लागल्याने तो खाली पडून गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर, रेल्वेतील सुरक्षा रक्षकांनी संबंधित व्यक्तीला मुंबईतील (Mumbai) सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. 

कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि दोन मधील ओव्हरहेड वायरच्या खांबावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारासएक अज्ञात व्यक्ती चढला. रेल्वे आरपीएफ जवान आणि जीआरपी पोलिसांनी त्याला खाली येण्यासाठी विनवणी केली, ते त्याची समजूत काढत होते. मात्र, त्याने एका फलाटावरुन दुसऱ्या फलाटाच्या दिशेने खांबावर चालण्यास सुरुवात केली. त्याला करंट लागू नये यासाठी काही वेळेकरीता रेल्वे स्थानकातील वीज पुरवठा देखील खंडीत केला गेला होता. फलाट क्रमांक एक अ , एक, दोन , तीन आणि चार या पाच फलाटावरील रेल्वे सेवा पूर्णपणे बंद होती. लोकल गाड्या थांबल्या होत्या. रेल्वे स्थानक प्रवाशांनी तुडुंब भरले होते. दुपारचे 2 वाजून 42 मिनिटांनी आरपीएफने त्याला खाली उतरविण्याकरीता अग्नीशमन दलाला पाचारण केले. पाच मिनिटात अग्नीशमन दलाचे जवान त्याठिकाणी  दाखल झाले, त्यांनीही संबंधितास खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर देखील तो व्यक्ती खाली आला नाही. त्याला खाली उतरविता आले नाही. मात्र, वीज पुरठवा सुरू झाल्याने अचानक त्याला करंट लागला आणि तो खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर, त्याला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. 

दरम्यान, हा व्यक्ती अधून-मधून खाली येण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने एकाकडून मोबाईल मागितला होता. त्याला पोलिस आणि फायर ब्रिगेडकडून मोबाईल पण दिला गेला. त्यानंतर काही वेळेने त्याने तो मोबाईल पुन्हा परत दिला. सध्या या व्यक्तीवर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तो कोण आहे त्याने हे कृत्य का केले ? याचा तपास पोलिस आणि आरपीएफकडून सुरु आहे. मात्र, जवळपास दोन तास रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला, असे अग्निशमन अधिकारी विनायक लोखंडे यांनी सांगितले. 

हेही वाचा

पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी

महत्त्वाच्या बातम्या

Mira Bhayandar News: रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
मीरा-भाईंदरमधील रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget