Kalyan Lok Sabha constituency : भाजप आणि शिंदे गटापाठोपाठ मनसेचाही कल्याण लोकसभेवर दावा, राज ठाकरेंनी तळ ठोकला
Kalyan Lok Sabha constituency : भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेनंतर मनसेनेही कल्याण लोकसभा मतदारसंघातून (Kalyan Lok Sabha) उमेदवार देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Rak Thackeray) दोन दिवस कल्याणमध्ये तळ ठोकणार आहेत.
Kalyan Lok Sabha constituency : भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेनंतर मनसेनेही कल्याण लोकसभा मतदारसंघातून (Kalyan Lok Sabha) उमेदवार देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Rak Thackeray) दोन दिवस कल्याणमध्ये तळ ठोकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान,आता मनसेचे आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी दिले आहेत. त्यामुळे मनसेने महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतलाच तर कल्याणची जागा कोणाला मिळणार?हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
काय म्हणाले अविनाश जाधव?
राज ठाकरे यांच्या कल्याण दौऱ्याबाबत बोलताना अविनाश जाधव म्हणाले, राज ठाकरे हे कल्याण लोकसभेचा आढावा घेण्यासाठी दोन दिवस तळ ठोकून आहेत. आज(दि.23) कल्याण तर उद्या डोंबिवली मधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. गेल्या काही दिवसात कल्याण - डोंबिवली मधील बिघडलेल्या कायदा व्येवस्थेवर आणि राजकीय स्थितीवर उद्याच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलतील. राजू पाटील कल्याणचे खासदार व्हावेत, अशी इच्छा मनसेच्या कार्यकर्तांची आहे.यावर राज ठाकरे आणि राजू पाटील निर्णय घेतील, असेही अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले.
मनसे भाजप युतीचे काय झाले?
गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि भाजप यांच्या युतीच्या चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर भाजपच्या स्टेजवर दाखल झाले होते. यावेळी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, राज्यात भाजप आणि मनसेची युती होईल का नाही ते आताच सांगू शकत नाही, मात्र मुंबईतील समस्यांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. शिवाय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळा नांदगावकर यांचा आमचे सहकारी असा केला होता. त्यामुळे मनसे आणि भाजप दरम्यान युती होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. दरम्यान, असे असले तरीही अद्याप दोन्ही पक्षाकडून युतीबाबत कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
इतर महत्वाच्या बातम्य़ा
Ajit Pawar on Uddhav Thackeray : मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं काम असं म्हणतील आणि मतं मिळवतील; अजित पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला