एक्स्प्लोर

Kalyan: कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप समर्थकांमध्ये राडा, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण

Shivsena Vs BJP : भाजपचे कार्यकर्ते भिंतीवर भाजपचे चिन्ह रंगवत असल्याचा राग धरून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याची घटना घडली. 

ठाणे : कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात कुरबुरी सुरू असल्याचे आज पुन्हा एकदा समोर आलं. कल्याण पूर्व चक्की नाका परिसरात भाजपचे चिन्ह भिंतीवर रंगवत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शिंदे गटाच्या नगरसेवकाच्या समर्थकांनी विरोध करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर भाजपने देखील आक्रमक पवित्रा घेतला. भाजपचे कल्याण पूर्व शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी आपल्या नगरसेवकांना आवरा अन्यथा आम्ही हात सोडू असा इशारा शिवसेना शिंदे गटाला दिलाय. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांकडून युतीत सर्वकाही आलबेल असल्याचे सांगण्यात येत असले तरी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये  कुरबुरी सुरूच असल्याचे दिसून येतंय.कल्याण चक्की नाका टेकडी परिसरात भाजपा कार्यकर्त्यांकडून भिंतींवर भाजपच्या पक्ष चिन्हाचे चित्र रंगवण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान शिंदे गटाचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे समर्थक त्या ठिकाणी आले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना विरोध केला आणि तीन ते चार कार्यकर्त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. 

शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या सांगण्यावरूनच भाजप कार्यकर्त्याना मारहाण झाल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला. यावेळी भाजप कल्याण शहराध्यक्ष संजय मोरे यांनी तुमच्या नगरसेवकांना आवरा अन्यथा आम्ही हात सोडू असा इशारा शिवसेना शिंदे गटाला दिला आहे. भाजप शहर अध्यक्षासह कार्यकर्ते कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले. घडल्या प्रकाराबाबत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.  

डोंबिवलीतही शिंदे गट- भाजपात वाद

डोंबिवलीत (Kalyan Dombivli Latest News) एका भाजप पदाधिकाऱ्यावर त्यांच्याच पक्षाच्या महिला कार्यकर्तीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा गुन्हा जून महिन्यात दाखल करण्यात आला होता. यामागे शिवसेनेतील शिंदे गटाचा हात असल्याचा आरोप करत भाजपने डोंबिवलीत मोर्चा काढला होता. तसेच यापुढे शिंदे गटाला सहकार्य करणार नसल्याचा ठराव स्थानिक कार्यकर्त्यांनी केला होता. त्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला होता. 

नेमक्या याच कारणामुळे संतापलेल्या श्रीकांत शिंदेंनी थेट आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. शिवसेना-भाजपच्या युतीत क्षुल्लक कारणांसाठी मिठाचा खडा टाकण्याचं स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर वरिष्ठ स्तरावर हा वाद मिटवण्यात आला. पण आता कल्याणमध्ये तशीच परिस्थिती निर्माण होतेय का काय असा प्रश्न विचारला जात आहे. 

ही बातमी वाचा: 

 

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
मुसळधार पाऊस, डोक्यावर प्लास्टिक, उघड्यावरच केले अंत्यसंस्कार, स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतरही मुलभूत सुविधांचा अभाव
मुसळधार पाऊस, डोक्यावर प्लास्टिक, उघड्यावरच केले अंत्यसंस्कार, स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतरही मुलभूत सुविधांचा अभाव
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Embed widget