Crime News : ओला कॅब बुक करायचे अन् नंतर चाकूचा धाक दाखवून लुटायचे; एका अल्पवयीनसह चार आरोपी अटकेत
Crime News: ओला कॅब बुक करून त्याच्या चालकाला लुटणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एक अल्पवयीन आरोपी आहे.
डोंबिवली : ओला चालकाला (Ola Cab Driver) कटरने गळा कापण्याची धमकी देणाऱ्या चार लुटारूंना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने (Kalyan Crime Branch) सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक लोकेशनच्या आधारे बेड्या ठोकण्यात यश आले. विशेष म्हणजे अटक लुटारू हे प्रवाशी असल्याचे भासवणून त्यांनी डोंबिवली पूर्वेकडील चोळेगाव परिसरात 9 ऑक्टोबर रोजी लुटमारीचा प्रकार केला होता. आकाश दिनेश सिंग (वय 20 रा. खंबाळपाडा, डोंबिवली पूर्व), राहुल भरत जगताप (वय 20 रा. इंदीरानगर झोपडपटटी, डोंबिवली पूर्व) सन्नी रिषीपाल तुसांबड (वय 18 रा. त्रिमुर्तीनगर झोपडपटटी, डोंबिवली पूर्व ) आणि एक अल्पवयीन अशी चार लुटारूंची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेकडील चोळेगाव परिसरातील एका प्रवाशाने मोबाईलवरून ओला अँपद्वारे इच्छितस्थळी जाण्यासाठी ओला कॅब 9 ऑकटोबर रोजी पहाटेच्या सुमारास बुक केली होती . त्यानंतर काही वेळातच बुक केलेली ओला कॅब करून त्या कारमध्ये चार लुटारू प्रवाशी बोलून बसले. त्यानंतर कार निर्जनस्थळ असलेल्या ठाकुर्ली पुर्व भागातील रस्तावरून जात असताना अचानक एका लुटारुने चालकाच्या गळ्यावर कटर लावून धमकी देत, कार खाली उतरण्यास सांगितले. चालकही घाबरून कारच्या बाहेर येताच इतर लुटारूंनी कारमधील रोकड आणि चांदीचे पैंजण, मोबाईल असा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन पळून गेले.
दरम्यान या घटनेनंतर ओला चालकाने रामनगर पोलीस ठाणे गाठून अज्ञात लुटारू प्रवाश्यावर भा.दं.वि कलम 392, 506 (2), 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर रामनगर आणि कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण करून संयुक्त तपास सुरू केला असता, चारही लुटारूंचे नाव व पत्ता निष्पन्न करून त्यांचा शोध घेऊन चारही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
अटक लुटारू पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना देखील धमकावून लुटपाट करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. शिवाय रिक्षा चोरी देखील चोरी केल्याचे समोर आले. ओला चालकाकडून लुटमार केलेले 39 हजार 999 किमतीच्या वस्तू, रोख रक्कम चांदीचे पैंजण मोबाईल इत्यादी मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तर आरोपींनी आतापर्यंत किती जणांना लुटले आहे याबाबत पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक, नितीन गीते यांनी दिली आहे.