एक्स्प्लोर

Kalyan APMC : मुंबईतील मृत्यूचा परिणाम! कल्याण APMC मध्ये 12 ट्रक कलिंगड पडून, ग्राहकांची पाठ; शेतकरी-विक्रेते हवालदिल

Watermelon Impact On APMC : मुंबईतील घटनेनंतर कलिंगडाबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कल्याण APMC मध्ये 12 ट्रक माल विक्रीअभावी पडून आहे. त्यामुळे शेतकरी आणि विक्रेते संकटात सापडल्याचं चित्र आहे.

मुंबई : मुंबईत घडलेल्या एका धक्कादायक घटनेनंतर कलिंगडाच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला असून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Kalyan APMC) तब्बल 10 ते 12 ट्रक कलिंगडाचा माल विक्रीअभावी पडून (Watermelon Sales) आहे. ग्राहकांनी अचानक कलिंगड खरेदीकडे पाठ फिरवल्यामुळे शेतकरी आणि विक्रेते मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. किमान उत्पन्न भावही भरून निघतोय की नाही याची चिंता आता त्यांना पडल्याचं चित्र आहे. 

मुंबईत एका कुटुंबाने बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ले आणि त्यानंतर चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र अन्न आणि औषध प्रशासनाने या मृत्यूचा कलिंगडाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Watermelon Market Impact : बाजारात पडून राहिला लाखोंचा माल

उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगडाला मोठी मागणी असते. दररोज कोट्यवधी रुपयांची फळांची आवक होणाऱ्या या बाजारात सध्या कलिंगडाच्या खरेदीत मोठी घट झाली आहे. चार दिवसांपासून ट्रकमध्ये पडून असलेल्या मालामुळे मोठ्या प्रमाणात कलिंगड खराब होऊ लागले आहे. परिणामी विक्रेत्यांवर तो माल फेकून देण्याची वेळ आली आहे.

Watermelon Price Drop : दर कोसळले, तरीही ग्राहक नाही

घटनेपूर्वी किरकोळ बाजारात कलिंगड 50 रुपये प्रति किलो दराने विकले जात होते, तर मोठ्या आकाराच्या कलिंगडाला 80 ते 100 रुपये प्रति किलो दर होता. मात्र आता दर घसरले असतानाही ग्राहक खरेदीसाठी पुढे येत नसल्याचं चित्र आहे. 

Watermelon Farmer Crisis : शेतकरी आणि ट्रक चालक अडचणीत

अहिल्यानगर, बीड, नाशिक येथून कलिंगड घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना आणि ट्रक चालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. विक्री होत नसल्याने उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्चही निघत नाही. वाहनांचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न चालकांसमोर उभा ठाकला आहे.

FDA Clarification On Watermelon : प्रशासनाचा निर्वाळा, तरीही भीती कायम

अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की मुंबईतील मृत्यू कलिंगडामुळे झालेले नाहीत. वैद्यकीय तज्ज्ञांनीही नागरिकांनी भीती न बाळगता फळांचे सेवन करावे, असे आवाहन केले आहे. तरीदेखील नागरिकांच्या मनातील भीती कमी होत नसल्याने त्याचा थेट फटका शेतकरी आणि विक्रेत्यांना बसत आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
मुसळधार पाऊस, डोक्यावर प्लास्टिक, उघड्यावरच केले अंत्यसंस्कार, स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतरही मुलभूत सुविधांचा अभाव
मुसळधार पाऊस, डोक्यावर प्लास्टिक, उघड्यावरच केले अंत्यसंस्कार, स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतरही मुलभूत सुविधांचा अभाव
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget