Bhiwandi: भिवंडीत उघड्या चेंबरमध्ये पडून दुचाकीस्वार महिलेचा अपघात; घटना सीसीटीव्हीत कैद
Bhiwandi News: नाल्यांवरील चेंबरचं झाकण अनेक ठिकाणी उघडं असल्याने अपघातांचं प्रमाण वाढलं आहे.
भिवंडी: भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेअंतर्गत गटार तसेच नाल्यांवरील चेंबरचं झाकण अनेक ठिकाणी उघडं असल्याने अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. अशीच एक घटना भिवंडी (Bhiwandi) शहरातील पीरानी पाडा येथे सोमवारी (4 सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास घडली आहे. एका दुचाकीस्वार महिलेच्या घरी जात असताना नाल्यावरील उघड्या चेंबरचा अंदाज न आल्याने अपघात झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दुचाकी नाल्यात पडून दोघे जखमी
भिवंडीत घडलेली घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दुचाकी थेट नाल्यात पडून दोघे जखमी झाल्याची घटना भिवंडीत घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेअंतर्गत अनेक ठिकाणी गटार आणि नाल्यांवरील चेंबरला झाकण नाही, त्यामुळे अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अनेकदा चेंबरचं झाकण चोरीचा प्रकार देखील समोर आला आहे. परंतु महानगर पालिकेच्या वतीने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असं असताना भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका या उघड्या चेंबरवर झाकण कधी बसवणार? की एखाद्याचा जीव गेल्यानंतर या चेंबरवर झाकण बसवलं जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्यात नाशिक जिल्ह्यात अपघातांचं प्रमाण जास्त
राज्यातील अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं असून देशातील यादीत महाराष्ट्र पहिल्या दहामध्ये आहे. तर राज्यात नाशिकचा नंबर पहिल्या क्रमांकावर असून यंदा जानेवारी ते जुलै या सात महिन्यात नाशिकमध्ये 914 अपघात झाले असून यात 578 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 441 जण जखमी झाले आहेत. यात महत्वाची बाब म्हणजे अतिवेग नाशिककरांच्या जीवावर बेतत असल्याचं महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आलं आहे.
रात्रीची वेळ, मृत्यूची वेळ
दरम्यान, अपघातांवर योग्य उपाययोजना करून रस्ते अपघात आणि मृत्यूची संख्या कमी करण्याच्या प्रयत्नात, महामार्ग पोलिसांनी सर्व अपघातांचं विश्लेषण केलं आहे. यानुसार असं आढळून आलं की, सर्वाधिक अपघात मध्यरात्रीच्या दरम्यान झाले आहेत, संध्याकाळी 4 ते 8 ही रस्त्यांवरील वाहतुकीची सर्वाधिक वेळ असते आणि रस्त्यावर जास्त वाहनं असतात, तर वास्तविक रॅश ड्रायव्हिंग रात्री 8 नंतर सुरू होते. रात्री 8 नंतर रस्त्यावर वाहनांची संख्या कमी होते, यामुळे अनेकजण ओव्हरस्पीडच्या नादात जीव गमावून बसतात. यामुळे रात्रीच्या वेळी अपघातांची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :