ठाणे : बकरी ईदनिमित्त हिंदू बांधवांना कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गादेवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते. याचा विरोध शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी 1986 साली सुरू केला होता. या नियमांचा विरोध म्हणून दिघे घंटा नाद करायचे. एकीकडे मुस्लीम बांधव नमाज पठण करतात तर दुसरीकडे हिंदू घंटा नाद करत देवीची आरती करतात. यावेळीदेखील शिवसैनिकांनी दुर्गाडी किल्ल्याच्या बाहेर घंटानाद करत आंदोलन केले. 


आनंद दिघे यांनी चालू केले होते आंदोलन


दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूला मुस्लीम बांधवांचा ईदगाह असल्यामुळे त्या ठिकाणी दरवर्षी मुस्लीम बांधव बकरी ईदच्या निमित्ताने नमाज पठाण करत असतात. त्यामुळे हिंदू बांधवांना देवीचे दर्शन आणि पूजा काही काळ बंद करण्यात येते. याचा विरोध आनंद दिघे यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी घंटा नाद चालू केला होता. आनंद दिघे यांच्या नंतर हा विरोध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सुरू ठेवला होता. 


दुर्गाडी किल्ला काही काळासाठी करण्यात येतो बंद 


यावेळीदेखील शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात जमत घंटनाद केला. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. आम्हाला दुर्गाडी किल्ल्यात देवीच्या दर्शनासाठी जाऊ द्यावे, अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांची होती. बकरी ईदच्या निमित्ताने दुर्गाडी किल्ल्यावरील देवीचे दर्शन काही काळासाठी बंद करण्यात येते. यालाच विरोध म्हणून शिवसैनिक घंटानाद करतात.  


दोन्ही गटाचे कार्यकर्ते आंदोलनासाठी उपस्थित


यावेळीदेखील दुर्गाडी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिवसनैकि जमले होते. विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचेही काही कार्यकर्ते उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे यांचे कार्यकर्ते एकमेकांत मिसळू नयेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे दोन्ही गट वेगळे ठेवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. या दोन्ही गटांनी दुर्गाडी किल्ला परिसरात काही काळ घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला होता.


हेही वाचा :


Maharashtra LIVE Updates : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर!


Pankaja Munde : आत्महत्या केलेल्या गणेश बडेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी मी घेणार, पंकजा मुंडेंनी केलं कुटुंबियांचं सांत्वन