बीड : लोकसभेत निवडणुकीत (Beed Lok Sabha Election) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाल्याने बीडमधील त्यांचा समर्थक गणेश बडे याने आत्महत्या केली. पंकजा मुंडे आत्महत्या केलेल्या गणेश बडे यांच्या अंत्यविधी वेळी पोहोचल्या होत्या. कुटुंबियांच्या आक्रोशाने उपस्थित नेतेही गहिवरले होते. गणेश बडेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी मी घेणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. गणेश बडेच्या कुटुंबियांचं सांत्वन करताना पंकजा मुंडे यांनाही अश्रू अनावर झाले होतं.


पंकजा मुंडेंकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचं सांत्वन


भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदार संघात पराभव झाल्याने शिरूर तालुक्यातील वारणी येथील गणेश बडे या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या अंत्यविधी प्रसंगी पंकजा मुंडे या वारणी येथे पोहचल्या. यावेळी बडे यांच्या कुटुंबाचा आक्रोश एकूण उपस्थित नेत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर बीड जिल्ह्यात तिघांनी आत्महत्या केल्या आहेत.


माझ्यावर जी वेळ आली ती कोणत्याच नेत्यावर आली नसेल


पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, मुंडे साहेब गेल्यानंतर मी शपथ घेतली होती की मी कधीच रडणार नाही. मी शपथ घेतली होती की मी लढणार आहे रडणार नाही पण आता कशाच्या जीवावर लढू मी. माझ्यासाठी स्वतःचं जीवन बाजूला सारून काम करणारी माणसं बघितलं, पण माझ्यासाठी स्वतःचा आयुष्य संपवणारी मुलं मी आज बघितले. एखादा माणूस आपल्यातून निघून गेला की, त्याची पोकळी त्याच्या कुटुंबाला जाणवत असते, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.


आत्महत्या केलेल्या गणेश बडेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी घेणार


तुमच्या जिवात आमचा जीव असतो.  मुंडे साहेबाला त्यांच्या चीते समोर मी जे वचन दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी राजकारणात आहे. आपल्या कुटुंबाला आपल्या जवळच्या माणसाला असं उघड्यावर पाडून स्वतःच आयुष्य संपवू नका कोणीही आत्महत्या करू नका. गणेश च्या दोन्ही मुलीची जबाबदारी मी घेणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.


35 वर्षीय  तरूणाने जीवन संपवलं


शिरूर कासार तालुक्यातील वारणी गावातील एका 35 वर्षीय तरूणाने लोकसभेच्या निवडणूकितील पंकजाताई मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने नैराशेपोटी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पंकजा मुंडे ह्या लोकसभेच्या उमेदवार होत्या मात्र त्यांचा अल्पमतानी पराभव झाला. या पराभवातून आलेल्या नैराशेपोटी गणेश उर्फ भाऊसाहेब बडे या तरूणाने रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास चिंचवन नावाच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :


पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल