Maharashtra LIVE Updates : दिल्ली विमानतळावर वीजपुरवठा खंडित, सर्व देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम 

Maharashtra Updates News LIVE : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 17 Jun 2024 02:54 PM
अमोल कीर्तिकर आमचे हे जिंकलेले खासदार आहेत- आदित्य ठाकरे

अमोल कीर्तिकर आमचे हे जिंकलेले खासदार आहेत- आदित्य ठाकरे


निकाल आल्यानंतर देशभरात चर्चा होतीये ते evm किती सुरक्षित आहेत 


 ५ जून पासून यावर चर्चा सुरु आहे 


या सगळ्यांवर कोर्टाची लढाई लढायची आहेच, असे आदित्य ठाकरे म्हणाले.  


 

Devendra Fadnavis Delhi Visit : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार, वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता

नागपूरवरून संध्याकाळी देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार


रात्री दिल्लीत भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता

Delhi Airport Power Cut : दिल्ली विमानतळावर वीजपुरवठा खंडित, सर्व देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम 

दिल्ली : दिल्ली विमानतळावर वीजपुरवठा खंडित 


 सर्व प्रणाली बंद 


 सर्व देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम 


 गेल्या 10 मिनिटांपासून वीज बंद आहे

संभाजीनगरातील दौलताबादमध्ये दोन तरुणांच्या गटात वाद, 5 जण जखमी

छत्रपती संभाजीनगरजवळ असलेल्या दौलताबादमध्ये दोन तरुणांच्या गटात वादावादी


नागेश्वर महादेव मंदिराजवळ झाली वादावादी


किरकोळ कारणावरून वादावादी


गाड्यांची तोडफोड, एक बुलेट गाडी जाळली


पोलीस घटनास्थळी दाखल, परिस्थिती नियंत्रणात


5 जण जखमी, उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवलं

Sharad Pawar : शरद पवार पुन्हा एकदा बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर

शरद पवार पुन्हा एकदा बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर


शरद पवार करणार तीन दिवस बारामती तालुक्यात दौरा


बारामती लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा झाल्यानंतर शरद पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर


उद्यापासून शरद पवारांच्या दौऱ्याला सुरुवात

Fire In Bhendi Bazar : मोठी बातमी! भेंडी बाजार परिसरात रहिवाशी इमारतीला आग 

भेंडी बाजार परिसरात रहिवाशी इमारतीला आग 


तीन मजली इमारतीला लागली आग 


चार फायर इंजिन आणि तीन टँकर घटनास्थळी 


आज विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

Fire In Bhendi Bazar : मोठी बातमी! भेंडी बाजार परिसरात रहिवाशी इमारतीला आग 

भेंडी बाजार परिसरात रहिवाशी इमारतीला आग 


तीन मजली इमारतीला लागली आग 


चार फायर इंजिन आणि तीन टँकर घटनास्थळी 


आज विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

राहुल गांधी वायनाड मतदारसंघ सोडणार- सूत्र

काँग्रेसेचे नेते तथा खासदार राहुल गांधी हे वायनाड मतदारसंघ सोडणार आहेत. त्यांचा या लोकसभा निवडणुकीत एकूण दोन मतदारसंघांवर विजय झाला होता. त्यामुळे आता ते वायनाड हा मतदारसंघ सोडणार आहेत, असे सांगितले जात आहे.  

Mira Road Bomb Rumours : मीरा रोडच्या वोक्हार्ड रुग्णालयात बॉम्ब? नागरिकांची ये-जा थांबवली; तपासणी चालू!

मीरा रोड : मीरा रोडच्या वोक्हार्ड हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असल्याची खबर मिळताच नयानगर पोलिसांनी हॉस्पिटलजवळ बॅरिकेडिंग करून नागरिकांची ये-जा थांबवली आहे. पोलिसांनी बॉम्ब शोधण्यासाठी बॉम्ब निकामी पथक आणि डॅाग स्कॉट यांना पाचारण केले आहे.
सध्या हॅास्पिटलची तरासणी सुरु आहे. अद्याप काही आढळून आलेलं नाही.

Mira Road Bomb Rumours : मीरा रोडच्या वोक्हार्ड रुग्णालयात बॉम्ब? नागरिकांची ये-जा थांबवली; तपासणी चालू!

मीरा रोड : मीरा रोडच्या वोक्हार्ड हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असल्याची खबर मिळताच नयानगर पोलिसांनी हॉस्पिटलजवळ बॅरिकेडिंग करून नागरिकांची ये-जा थांबवली आहे. पोलिसांनी बॉम्ब शोधण्यासाठी बॉम्ब निकामी पथक आणि डॅाग स्कॉट यांना पाचारण केले आहे.
सध्या हॅास्पिटलची तरासणी सुरु आहे. अद्याप काही आढळून आलेलं नाही.

Mumbai Water Crisis : मुंबईला 20 ते 22 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा; पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता

मुंबईत एकूण पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये 5.38 टक्के इतकाच पाणीसाठा आहे


मुंबईला 20 ते 22 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा 


मुंबईत पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता


अप्पर वैतरणा आणि भातसा जलाशयात शून्य टक्के पाणीसाठा


कोणत्या जलाशयात किती पाणीसाठा उपलब्ध


अप्पर वैतरणा -0 टक्के


मोडक सागर - 15.73 टक्के


तानसा - 22.05 टक्के


मध्य वैतरणा - 9.64 टक्के


भातसा - 0 टक्के


विहार - 17.92 टक्के


तुळसी- 24.46 टक्के


आज जलाशयात एकूण 77851 दशलक्ष लीटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे 


रोज 3800 दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा होतो


यामध्ये दहा ते पंधरा टक्के पाणी कपात सध्या करण्यात आली आहे

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना मारहाण, धक्काबुक्की झाल्याचा प्रकार; तक्रार दाखल

नाशिक - त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना मारहाण, धक्काबुक्की झाल्याचा प्रकार 
- दर्शनासाठी गेलेल्या नाशिकच्या भाविकांचा आरोप 
-  भाविकांकडून पोलिसात तक्रार 
- 4 ते 5 सुरक्षा रक्षकांनकडून धक्काबुक्की मारहाण झाल्याचा आरोप

नागपूर फूटपाथ अपघात प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा होणार, फडणवीसांचे आश्वासन; सखोल चौकशीचे आदेश!

काल मध्यरात्री नागपुरात कारचालकाने फूटपाथवर मजुरांना चिरडण्याची घटना घडली. या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा होईल, हे सुनिश्चित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. रात्रीची गस्त वाढवून 'ड्रंक अँड ड्राईव्ह'ची मोहीम तीव्र करावी, असेही त्यांनी पोलिस प्रशासनाला सांगितले आहे.

संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर, कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. आज उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर गेले आहेत. या भेटीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

BJP Action On Lok Sabha Election : लोकसभेतील पराभवानंतर भाजप अॅक्शन मोडमध्ये, पराभूत मतदारसंघातील कारणांचा घेतला जाणार आढावा

- लोकसभेतील पराभवानंतर भाजपचा अॅक्श प्लॅन 
- राज्यातील पराभूत मतदारसंघातील कारणांचा घेतला जाणार आढावा
- प्रमुख नेत्यांवर मतदारसंघात जाऊन पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी
- होमग्राऊंड राखू न शकलेल्या विखे पाटलांवर नांदेडच्या विश्लेषणाची जबाबदारी
- महायुतीने गमावलेल्या 33 मतदारसंघांचा घेतला जाणार आढावा
- जिंकलेल्या जागांवरही भाजपने पाठविले निरीक्षक
- 22 जूनपर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना द्यावा लागणार अहवाल
- बीडची जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे


 बारामती मंगलप्रभात लोढा तर श्रीकांत भारतीय घेणार चंद्रपूरचा आढावा

Pune Accident : पुण्यात अपघाताची मलिका सुरूच, पॉर्शे कार दुर्घटनेनंतर 25 दिवसांत 70 अपघात 

पुण्यात अपघाताची मलिका सुरूच 


पॉर्शे कार अपघातानंतर पुण्यात 25 दिवसांत पुण्यात 70 अपघात 


70 अपघातात तब्बल 31 जणांचा मृत्यू 


पुण्यातील विविध परिसरात अपघात


54 जण गंभीर आणि किरकोळ जखमी 


19 मे ते 14 जूनदरम्यान घडले अपघात 


 पुण्यातील वाहनांचा वेग घेतोय जीव 


अपघातातील चालक मद्यपी आहेत.


काही चालक पोलिसांच्या ताब्यात आहेत तर काही चालक फरार आहेत

उद्धव ठाकरे यांचे मिशन विदर्भ! नागपूर जिल्ह्यातील 12 पैकी 7 जागांवर दावा सांगणार

उद्धव ठाकरे यांचे मिशन विदर्भ!


नागपूर जिल्ह्यातील 12 पैकी 7 विधानसभा क्षेत्रांवर केला दावा


पूर्व विदर्भात पाच लोकसभा मतदारसंघातील 30 पैकी 14 विधानसभा क्षेत्रांवरही करणार दावा


उद्धव ठाकरे यांचे मिशन विदर्भ काँग्रेसची डोकेदुखी वाढवणार 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक, मणिपूरच्या मुद्द्यावर होणार चर्चा!

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक


 मणिपूरबाबत बोलावली आढावा बैठक 


आज संध्याकाळी चार वाजता होणार बैठक 


मणिपूरचे मुख्यमंत्री आणि मनिपूरमधील पोलीस दलातील उच्च अधिकारी बैठकीत सहभागी होणार 


कालच राज्यपाल अनुसया उईके यांनी घेतली होती अमित शहा यांची भेट 


संघाने केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर बैठकीला मोठं महत्त्व

धक्कादायक! नागपूरमध्ये फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना एका कारने चिरडलं 

नागपूरमध्ये फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना एका कारने चिरडलं 


यात दोन 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहे 


मृतकामध्ये एका बालकाचा समावेश आहे 


रात्री 12 वाजताच्या सुमारास एखा कारने मजुरांवर चिरडले


धक्कदायक म्हणजे आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याच्या नादात कारला मागेपुढे केल्याने अपघाताची तीव्रता वाढली 

धक्कादायक! नागपूरमध्ये फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना एका कारने चिरडलं 

नागपूरमध्ये फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना एका कारने चिरडलं 


यात दोन 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहे 


मृतकामध्ये एका बालकाचा समावेश आहे 


रात्री 12 वाजताच्या सुमारास एखा कारने मजुरांवर चिरडले


धक्कदायक म्हणजे आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याच्या नादात कारला मागेपुढे केल्याने अपघाताची तीव्रता वाढली 

मोठी बातमी! जेजुरी गडावर बैल, घोडे आणण्यास बंदी; संस्थानचा निर्णय

जेजुरी गडावर बैल, घोडे आणण्यास बंदी


जनावरे गडावर आणल्याने भाविक जखमी होत असल्याने संस्थानचा निर्णय


अनेक भाविक शर्यतीचे बैल, घोडे जेजुरी गडावर आणतात


भाविक जखमी होत असल्याने मंदिर प्रशासनाने घेतला निर्णय

पवार यांच्या राष्ट्रवादीचं ठरलं? विधानसभेत 100 जागा लढवणार; मविआपुढे प्रस्ताव ठेवणार

लोकसभेचा स्ट्राइक रेट पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीकडे 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार 


या आठवड्यात जयंत पाटील राज्यातील विधानसभा निहाय मतदार संघाची माहिती घेणार 


त्यानंतरच्या आठवड्यात महाविकास आघाडीची एकत्रित बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती

पवार यांच्या राष्ट्रवादीचं ठरलं? विधानसभेत 100 जागा लढवणार; मविआपुढे प्रस्ताव ठेवणार

लोकसभेचा स्ट्राइक रेट पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीकडे 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार 


या आठवड्यात जयंत पाटील राज्यातील विधानसभा निहाय मतदार संघाची माहिती घेणार 


त्यानंतरच्या आठवड्यात महाविकास आघाडीची एकत्रित बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती

पवार यांच्या राष्ट्रवादीचं ठरलं? विधानसभेत 100 जागा लढवणार; मविआपुढे प्रस्ताव ठेवणार

लोकसभेचा स्ट्राइक रेट पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीकडे 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार 


या आठवड्यात जयंत पाटील राज्यातील विधानसभा निहाय मतदार संघाची माहिती घेणार 


त्यानंतरच्या आठवड्यात महाविकास आघाडीची एकत्रित बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती

पवार यांच्या राष्ट्रवादीचं ठरलं? विधानसभेत 100 जागा लढवणार; मविआपुढे प्रस्ताव ठेवणार

लोकसभेचा स्ट्राइक रेट पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीकडे 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार 


या आठवड्यात जयंत पाटील राज्यातील विधानसभा निहाय मतदार संघाची माहिती घेणार 


त्यानंतरच्या आठवड्यात महाविकास आघाडीची एकत्रित बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती

पुण्यातील विधानसभांच्या जागांवरून महाविकास आघाडीत संघर्ष ? आता ठाकरे गटाचाही सहा जागांवर दावा

- पुण्यातील विधानसभांच्या जागांवरून महाविकास आघाडीत संघर्ष ?


- शरद पवार गटानंतर आता उद्धव ठाकरे गटाचाही पुण्यातील सहा मतदारसंघावर दावा 


- पुण्यातील 8 पैकी सहा मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याची पवार गट आणि ठाकरे गटाची वरिष्ठांकडे मागणी


- कोथरूड, पर्वती, वडगाव शेरी, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा या मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा 


- तर हडपसर, वडगाव शेरी, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला मतदारसंघावर शरद पवार गटाचा दावा 


- ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या दाव्यानंतर शहरात महाविकास आघाडीत संघर्ष वाढण्याची शक्यता

Maharashtra State Assembly Election : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत टेन्शन, पीपल्स रिपब्लिकन पक्षाने मागितल्या 30 जागा

महायुतीतील पीपल्स रिपब्लिकन पक्षाने राज्यात विधानसभेला 30 जागा द्या, तसेच कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि महामंडळ प्रत्येकी एक देण्याची मित्रपक्षांकडे केलीय मागणी


 सरकार स्थापन झाल्यापासून सन्मानाचे स्थान पीपल्स रिपब्लिकन पक्षाला मिळाले नसल्याची देखील पक्षाची खंत


 यापूर्वी महायुतीत असलेल्या बच्चू कडूंनीदेखील स्वतंत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केलाय


तर सदाभाऊ खोत यांनी देखील काहीच पदरी पडत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केलीय


 त्यातच आता पीपल्स रिपब्लिकन पक्षांनीदेखील आपल्या या मागण्या मांडल्या आहेत, अन्यथा चर्चा करून वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत ते आहेत


त्यामुळे विधानसभेपूर्वी महायुतीत जागावाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून ठिणगी पेटायला सुरुवात झाली असे चित्र आहे.

पुण्यात पावसाचा मोठा ब्रेक, 8 दिवसानंतरही शहरात पाऊस बरसला नाही 

पुणे : पुण्यात पावसाने मोठा ब्रेक दिला आहे 


9 जूनला पुण्यात मान्सून दाखल झाल्याची घोषणा करण्यात आली होती   


मात्र 8 दिवसानंतरही पुणे शहरात पाऊस बरसला नाही 


पावसाची साधारण सरासरी अवकळी पावसानेच भरून काढल्याचं म्हंटल जातंय कारण 4 जून ते 8 जूनपर्यंत 230 मीमी पावसाची नोंद झाली 


मात्र मान्सून आगमनापासून पाऊस बंदच आहे 


मागच्या वर्षी शहरात मान्सून 25 जूनला दाखल झाला होता.

Sharad Pawar NCP : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पुण्यातील सहा मतदारसंघांवर दावा, शहर कार्यकारणीचा वरिष्ठांना अहवाल 

आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र लढण्याची भूमिका मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. अगदी त्याच वेळी पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक संपन्न झाली व या बैठकीनंतर पुणे शहरातील 8 पैकी 6 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार हवा असा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर कार्यकारिणीची महत्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे पार पडली. पक्षाची असलेली ताकद, उपलब्ध असलेले सशक्त उमेदवार, जिंकून येण्याची खात्री अशा अनेक निकषांवर पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. शहरातील हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कँटोन्मेंट या सहा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार हा विश्वास सर्वानुमते व्यक्त करण्यात आला. असा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवला आहे. या बैठकीस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी खासदार सौ.वंदनाताई चव्हाण, माजी आमदार ॲड. जयदेवराव गायकवाड़, जिल्हा अध्यक्ष माज़ी आमदार श्री. जगनाथबाप्पू शेवाळे, माज़ी आमदार कुमारभाऊ गोसावी, अंकुशराव काकडे, रवींद्र माळवदकर, प्रकाश म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

Pune Accident : पुण्यात पुन्हा मध्यरात्री विचित्र अपघात, भरधाव चारचाकीची रिक्षाला धडक

पुण्यात पुन्हा मध्यरात्री विचित्र अपघात


भरधाव चारचाकीने रिक्षाला दिली धडक


पुण्यातील धानोरी परिसरात घडला अपघात


रिक्षातील प्रवासी जखमी


चारचाकीने धडक दिलेल्या रिक्षाचे नुकसान

Kashmir Terriost Attack : काश्मीरच्या बंदीपोरा भागात दहशतवादी लपला? संपूर्ण परिसरात नाकाबंदी 

काश्मीरच्या बंदीपोरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती 


संपूर्ण परिसरात नाकाबंदी 


सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू 


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरबाबत बैठक घेतल्यानंतर काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दल अलर्ट मोडवर

Kolhapur Accident : कोल्हापुरात चारचाकीच्या धडकेत पोलीस कर्मचारी जखमी,  चालकाचे पलायन 

Kolhapur Police Accident : कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे आज रात्री वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकी वरील वासिम इसाक मुल्ला हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर कार चालकाने तेथून पलायन केल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.


याप्रकरणी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वासिम मुल्ला हे आपली ड्युटी करून दुचाकीवरून घरी निघाले होते. यावेळी कसबा बावड्यातून धैर्यप्रसाद मंगल कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या एका चार चाकी ने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते दुचाकीवरून हवेत उडून बाजूला पडले. यावेळी तेथील काही नागरिकांनी त्यांना सीपीआरमध्ये उपचारसाठी दाखल केले. चारचाकी मधील आणखी एक व्यक्ती जखमी झाल्याचे समजते. अपघातानंतर कारचालक तेथून निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

पार्श्वभूमी

मुंबई : सध्या देशात तसेच राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. देशात नुकतेच स्थापन झालेले एनडीए आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा देशपातळीवरील विरोधकांकडून केला जातोय. तर दुसरीकडे राज्यात राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली असून त्या दृष्टीने राजकीय नेत्यांनी आपली तयारी चालू झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Eknath Shinde Shivsena) आणि भाजप (BJP) या दोन पक्षांत अनेक ठिकाणी द्वंद्व चालू आहे. तर महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आम्ही आागामी विधानसभा निवडणूक (Maharashtra State Assembly Election) एकत्र लढवण्याचे संकेत दिले आहेत. अशा स्थितीत आजदेखील राजकीय पटलावर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. 


दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात साधारण सर्व ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पण मुंबईसह, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी पावसाने (Rain Update) काहीशी विश्रांंती घेतली आहे. या घडामोडींसह आंतरराष्ट्रीय, देश तसेच राज्य पातळीवर सर्व घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर! 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.